शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गुढीपाडव्यानिमित्त मंडळांतर्फे विविध सांस्कृतिक उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 00:56 IST

शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. तसेच शाळांमध्येही गुढीपाडवा सण साजरा करण्यात आला.

पंचवटी : शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. तसेच शाळांमध्येही गुढीपाडवा सण साजरा करण्यात आला.  दिंडोरीरोडवरील गोरक्षनगर सांस्कृतिक मित्रमंडळाच्या वतीने काढण्यात आलेल्या शोभायात्रेच्या समारोपप्रसंगी संपूर्ण गोरक्षनगर रहिवासीयांनी रस्ता सुरक्षेचे नियम पाळण्याची, झाडांचे, पर्यावरणाचे संरक्षण करण्याची व परिसर स्वछ राखण्याची प्रतिज्ञा घेतली.  गोरक्षनगरला नववर्षाच्या स्वागतासाठी गुढी उभारण्यात आली होती. सकाळी परिसरातून काढण्यात आलेल्या शोभायात्रेत शिवसंस्कृती ढोल पथकाचे ढोलवादक सहभागी झाले होते. ढोलताशे तसेच झांजरीच्या गजराने परिसर दुमदुमला होता. शोभायात्रेत थोर समाजसुधारक, विचारवंत, राम, सीता, शिवाजी महाराज, खंडेराव महाराज यांच्या वेशभूषा करून लहान मुले सहभागी झाली होती. या मुलांच्या हातातील भगवे ध्वज व प्रबोधनपर फलक लक्ष वेधून घेत होते. या उपक्र मात गोरक्षनगर, मेरी म्हसरूळ भागातील नागरिक सहभागी झाले होते. प्रमुख म्हणून आमदार बाळासाहेब सानप, प्रमोद जाधव, सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार चव्हाण, म्हसरूळचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र देशमुख आदी उपस्थित होते.  यावेळी गोरक्षनगर ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते अस्मिता दुधारे, ज्योती वाकचौरे यांचा उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. नववर्ष निमित्ताने नारीशक्तीचा सन्मान म्हणून लकी ड्रॉद्वारे महिलांचा पैठणी साडी देऊन सत्कार करण्यात आला.अनेक दीपांनी उजळला नंदिनीकाठसिडको : मराठी नववर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या निमित्ताने नंदिनी नदीचे आध्यात्मिक व सामाजिक महत्त्व वाढविण्याच्या दृष्टिकोनातून नंदिनी दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी पाच हजार पणती लावण्यात आल्या व प्रती समर्थ रामदास स्वामी यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी नंदिनीला पुनर्वैभव प्राप्त करून देण्याचा संकल्प करण्यात आला.  उंटवाडी येथील म्हसोबा मंदिर येथे रविवारी सायंकाळी गोदा संवर्धन मोहिमेचे मुख्य प्रवर्तक अमित कुलकर्णी व टीमच्या वतीने दीपोत्सव व महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. नंदिनीला पुनर्जीवन प्राप्त व्हावे यासाठी मोहिमेत विविध संघटना व युवकांनी सहभाग नोंदविला. आमदार देवयानी फरांदे, सोनलराजे पवार, महेश कडूस, नगरसेवक प्रियंका घाटे, श्यामकुमार साबळे, भाग्यश्री ढोमसे, हर्षदा गायकर, किशोर घाटे, रोशन घाटे, शिवाजी बरके, भाजपा मनोज बिरार, संदीप गायकर, किरण शिंदे, निशिकांत पगारे, उदय थोरात, योगेश गांगुर्डे, मनोज सावंत, बाळासाहेब मथुरे, सोमनाथ मुठाळ, योगेश बर्वे, प्रकाश बर्वे, अनुजा कुलकर्णी, कुलकर्णी सर, शिल्पा डहाके यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती.

टॅग्स :gudhi padwaगुढी पाडवा