मुलगी वाचवा हा संदेश देत शहरातील लक्कडकोट भागात समाज सेवा महिला बचत गटातील नीता बिवाल यांनी बचत गटातील महिलांसाठी लेक वाचवा व स्त्रीभ्रूण हत्या या विषयावर रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची, लिंबू चमचा आदी स्पर्धांचे आयोजन केले होते. रांगोळी स्पर्धेचे परीक्षण नगरपालिका मुख्याधिकारी संगीता नांदूरकर यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून दीपक लोणारी, सुनील पैठणकर, विकी बिवाल, सचिन सोनवणे, गणेश गवळी, सुमित थोरात आदी उपस्थित होते.
स्पर्धेतील प्रथम विजेत्या राधेश्याम गटातील सदस्य श्रीमती देवगावकर यांना २१०० रुपयांचे रोख पारितोषिक, द्वितीय पारितोषिक श्री दत्तकृपा गटातील अध्यक्ष पूजाताई पटेल यांना १५०० रुपये, तर तृतीय पारितोषिक ११०० रुपये ओम नमःशिवाय बचत गटातील अध्यक्ष उज्ज्वला पानमळे यांना मुख्याधिकारी नांदूरकर आणि मान्यवरांचे हस्ते देण्यात आले. उपस्थित महिलांना नीता बिवाल यांच्या गटाकडून स्कार्फ वाटप करण्यात आले.
याप्रसंगी मुख्यधिकारी नांदूरकर, शंतनू वक्ते, विखे यांची भाषणे झाली. प्रास्तविक व सूत्रसंचालन संदीप बोढरे यांनी केले. कार्यक्रमाला बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
===Photopath===
240121\24nsk_6_24012021_13.jpg
===Caption===
येवला येथे बचत गटाच्या महिलांसाठी आयोजित रांगोळी स्पर्धेप्रसंगी मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, दीपक लोणारी, सुनील पैठणकर आदी.