शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

पक्षांसाठी लावली विविध प्रकारची फळ झाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 18:53 IST

ब्राह्मणगाव : एकीकडे सर्वत्र चिमणी व अन्य प्रकारच्या पक्षांची संख्या कमी होत असताना येथील निसर्गप्रेमी पदवीधर शेतकरी प्रकाश अहिरे यांनी आपल्या शेतातील बंगल्याजवळ अनेक प्रकारची फुले, फळ झाडे लावून पक्ष्यांसाठी पाणी व धान्याची व्यवस्था केल्याने त्यांचे शेतात सद्या शेकडोच्या संख्येने चिमणी, कावळे, साळुंकी व अन्य पक्षी दररोज येत आहेत. आजूबाजूला झाडांची संख्या खूप असल्याने वातावरणात गारवा राहत असल्याने सर्व पक्षी दाणे खाऊन, पाणी पिऊन आनंदाने दिवसभर किलबिलाट करत असतात.

ठळक मुद्देब्राह्मणगाव : अंगणात पाण्याची अन् धान्याची केली व्यवस्था

ब्राह्मणगाव : एकीकडे सर्वत्र चिमणी व अन्य प्रकारच्या पक्षांची संख्या कमी होत असताना येथील निसर्गप्रेमी पदवीधर शेतकरी प्रकाश अहिरे यांनी आपल्या शेतातील बंगल्याजवळ अनेक प्रकारची फुले, फळ झाडे लावून पक्ष्यांसाठी पाणी व धान्याची व्यवस्था केल्याने त्यांचे शेतात सद्या शेकडोच्या संख्येने चिमणी, कावळे, साळुंकी व अन्य पक्षी दररोज येत आहेत. आजूबाजूला झाडांची संख्या खूप असल्याने वातावरणात गारवा राहत असल्याने सर्व पक्षी दाणे खाऊन, पाणी पिऊन आनंदाने दिवसभर किलबिलाट करत असतात.अहिरे यांना विविध प्रकारची झाडे लावण्याची तसेच पशुपक्षांची आवड आहे. त्यांनी पक्ष्यांसाठी पाण्याची स्वतंत्र व्यवस्था केली आहे. तसेच ते पक्षांसाठी दररोज दाणे टाकतात, पाणी ठेवतात. पक्षांसोबत तेथे मांजर, कुत्राअसून पक्षांचे रोजचे येणे खेळणे पाहून तेही त्या पक्षांसोबत रममान झाले आहे. सर्वत्र कडक ऊन, तापमान वाढलेले असताना येथे मात्र झाडांची दाट गर्दी असल्याने सुखद गारव्यामुळे पक्ष्यांचा किलबिलाट मनाला सुखद आनंद देऊन जातो.चिमणी, कावळा, साळुंकी अन्य रंगी बेरंगी पक्षी एकत्र येऊन पाण्याचा व दाणे खाऊन झाडावर विसावतात हा खरा आनंद असल्याचे प्रकाश अहिरे यांनी सांगितले.प्रतिक्रि या : ब्राह्मणगाव येथील माझ्या शेतातील बंगल्याजवळ दाट झाडी असल्याने शेकडो विविध प्रकारचे पक्षी येऊन धान्य खातात तसेच पिण्याचे पाण्याची व्यवस्था केली असल्याने दिवसभर पक्षांची किलबिलाट मनाला वेगळा आनंद देऊन जातो.- प्रकाश अीहरे, पक्षी व वृक्ष प्रेमी.