शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
4
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
5
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
6
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
7
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
8
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
9
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
10
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
11
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
12
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
13
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
14
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
15
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
16
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
17
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
18
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
19
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
20
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?

बुद्ध जयंतीनिमित्त वंदना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:12 IST

इंदिरानगर : पाथर्डी गाव येथे बुद्ध पौर्णिमेनिमित्त विश्वदीप बुद्ध विहार येथे डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांना कोविड योद्धा ...

इंदिरानगर : पाथर्डी गाव येथे बुद्ध पौर्णिमेनिमित्त विश्वदीप बुद्ध विहार येथे डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांना कोविड योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले.

यावेळी भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन प्रभागाचे नगरसेवक भगवान दोंदे, डॉ. छाया साळुंखे, सुनिता सोनवणे, मेघना आठवले यांच्या हस्ते करण्यात आले.

तसेच पिंपळगाव खांब येथील महापालिका रुग्णालयातील डॉ. छाया साळुंखे, डॉ. चारुदत्त जगताप, डॉ. स्मिता लोहार, सुनिता सोनवणे, शारदा बोरसे, प्रतिभा गावित, मीना कांदळकर, अशोक दोंदे यांचा कोविड योद्धा म्हणून शाल गुलाब पुष्प व सन्मानचिन्ह देऊन प्रभागाचे नगरसेवक भगवान दोंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सम्राट सोशल ग्रुपचे संदीप दोंदे , गौतम दोंदे, उत्तम दोंदे, सुधीर दोंदे, श्यामराव लोखंडे, हरीबाबा गांगुर्डे, मगन दोंदे, ज्ञानेश्वर दोंदे, रवी जाधव, राहुल दोंदे, जीवन दोंदे, पप्पू दोंदे, सागर दोंदे, विलास दोंदे, संतोष दोंदे, शरद दोंदे, श्रीकांत जाधव, मलिक भालेराव, सिद्धार्थ उनवणे, रवी शिंदे, संभाजी पवार, अशोक घाटेसाव उपस्थित होते.

---------------------------------

जनसुराज्यतर्फे अभिवादन

नाशिकरोड, प्रतिनिधी

जनसुराज्य शक्ती पक्षातर्फे भगवान गौतम बुद्ध जयंतीनिमित्त जिल्हाध्यक्ष विलासराज गायकवाड यांच्या हस्ते बुद्ध मूर्तीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी गायकवाड म्हणाले की, भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्मच देशाला तारू शकतो. भारतात विविध प्रकारच्या जाती आहेत. खरा धम्म म्हणजे दया, क्षमा, शांती असून त्याची आज देशाला नितांत गरज आहे. याप्रसंगी अमोल मोरे, विवेक चौहान, पृथ्वीराज गायकवाड, विलास कर्डक, प्रवीण कुमावत, बापू निकम, अमर जाधव, महेश काजळे, राकेश गायकवाड, सुदाम पगारे, अक्षय जाधव आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. शेवटी बुद्ध वंदना घेण्यात आली.

भाजपातर्फे बुद्ध वंदना

सिडको : नाशिक शहर भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्यावतीने तथागत गौतम बुद्ध पौर्णिमेनिमित्त फाळके स्मारक येथील बुद्ध विहारत बुद्ध वंदना घेऊन पूजन करण्यात आले याप्रसंगी भाजपा अनुसूचित जाती मोर्चा शहर अध्यक्ष शशांक हिरे, प्रा.कुणाल वाघ, गणेश कांबळे, नगरसेवक भगवान दोंदे, उत्तम दोंदे, राकेश दोंदे,, अशोक दोंदे, कुंदन खरे, दादाजी मोरे, संजय जाधव, उत्तम जाधव, भारत सपकाळे, बाळासाहेब सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

--------------------------

फोटो कॅप्शन (२७ बी५)

नाशिकरोड रेल्वे मालधक्का येथे रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनच्यावतीने भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना गुल्लूशेठ आनंद, कामगार नेते रामबाबा पठारे, भारत निकम, अनिल अहिरे, प्रभाकर रोकडे, राजू मोकळ, दीपक वाघ, कैलास भालेराव, नाना चंद्रमोरे, सागर शार्दुल, सुनील चंद्रमोरे, लखन गवळी, राहुल भालेरावस, संदीप वाकचौरे, जयराम जाधव आदी.

------------------------