शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

चुंचाळेच्या राखीव वनात भडकला ‘वणवा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:13 IST

नाशिक पश्चिम वनविभागाच्या अखत्यारित असलेल्या नाशिक वनपरिक्षेत्रातील चुंचाळे वन कक्ष क्रमांक २२७च्या राखीव वनात डोंगरमाथ्यावर अचानकपणे रात्रीच्या सुमारास कृत्रिम ...

नाशिक पश्चिम वनविभागाच्या अखत्यारित असलेल्या नाशिक वनपरिक्षेत्रातील चुंचाळे वन कक्ष क्रमांक २२७च्या राखीव वनात डोंगरमाथ्यावर अचानकपणे रात्रीच्या सुमारास कृत्रिम वणवा भडकला होता. या वणव्याची माहिती मिळताच त्वरित नाशिक पश्चिम वनविभागाचे कर्मचारी तसेच अग्निशमन दलाचे जवान आणि ग्रीन रिव्हॅल्युएशन संस्थेच्या काही स्वयंसेवकांनी धाव घेतली. डोंगर माथ्यावर आगीच्या ज्वाळा भडकत असून, वाळलेले गवत मोठ्या वेगाने जळत असल्याचे लक्षात आले. यावेळी रात्रीच्या किर्रर्र अंधारात वनसंपदा वाचविण्यासाठी जवानांसह वनकर्मचाऱ्यांनी डोंगर चढण्यास सुरुवात केली. बॅटरीच्या प्रकाशात डोंगर चढत आजूबाजूच्या झाडांच्या काही फांद्या तोडत त्याची झोडपणी तयार करून पारंपरिक पद्धतीने आग विझविण्यास सुरुवात केली. सुमारे पंधरा ते वीस लोकांनी झोडपणी करत पेटलेले गवत विझविण्यास सुरुवात केली. डोंगरमाथ्यावर आग भडकलेली असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना पाण्याचा मारा करणेही अशक्य होते. यामुळे जवानांनी फावडे, टिकाव आदी साहित्याच्या मदतीने गवत काढण्यास सुरुवात केली. वनकर्मचाऱ्यांनी चरप्रमाणे खोदकाम करत आग डोंगराच्या पायथ्याला असलेल्या रोपवनापर्यंत पोहोचणार नाही, याची खबरदारी घेतली. सुमारे दोन तास शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर भडकलेली आग अखेर विझविण्यात यश आले.

---इन्फो--

रोपवन सुरक्षित असल्याचा दावा

येथील टेकडीभोवती असलेल्या रोपवनात सुमारे दहा हजार रोपांची लागवड काही वर्षांपूर्वी करण्यात आली आहे. ग्रीन रिव्हॅल्युएशन या स्वयंसेवी संस्थेकडून रोपांची देखभाल केली जात आहे. रोपांची दमदार वाढ झाली असून, या रोपवनाला आगीमुळे मोठा धोका निर्माण झाला होता. मात्र, वेळीच वनविभाग व मनपाच्या अग्निशमन दलाच्या जवानांसह स्वयंसेवकांनी घेतलेल्या संयुक्त परिश्रमामुळे रोपवनाला आगीची झळ बसली नाही. रोपवन सुरक्षित असल्याचा दावा वनविभागाने केला आहे.

----

फोटो आर वर ०६फायर/१/२/३ नावाने सेव्ह आहे.

===Photopath===

060221\06nsk_24_06022021_13.jpg~060221\06nsk_25_06022021_13.jpg

===Caption===

चुंचाळे येथील डोंगराच्या सभोवताली असलेल्या रोपवनाजवळ रात्रीच्यावेळी असा वणवा पेटला होता~चुंचाळे येथील डोंगराच्या सभोवताली असलेल्या रोपवनाजवळ रात्रीच्यावेळी असा वणवा पेटला होता