शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मतदार यादीच्या वैधतेचा घोळ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 01:12 IST

नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रशासनाने मतदार यादीच्या वैधतेसाठी योग्यप्रक्रिया राबविली नसल्याचा आक्षेप कायम असून, प्रशासनाने नाकारले तरी उघड उघड दोन मतांचा गोंधळ दिसत आहे. निफाड पंचायत समितीच्या सभापती मंगला वाघ यांचे निधन, तर कळवण सभापतींवरील अविश्वास ठरावानंतरही या याद्यांमधील त्यांची नावे रिक्त नसल्याने गोंधळाला पुष्टी मिळाली आहे.

ठळक मुद्देविधान परिषद : मतदार नसतानाही यादीत नावे

नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रशासनाने मतदार यादीच्या वैधतेसाठी योग्यप्रक्रिया राबविली नसल्याचा आक्षेप कायम असून, प्रशासनाने नाकारले तरी उघड उघड दोन मतांचा गोंधळ दिसत आहे. निफाड पंचायत समितीच्या सभापती मंगला वाघ यांचे निधन, तर कळवण सभापतींवरील अविश्वास ठरावानंतरही या याद्यांमधील त्यांची नावे रिक्त नसल्याने गोंधळाला पुष्टी मिळाली आहे.विधान परिषदेच्या नाशिक जिल्हा स्थानिक स्वराज्य मतदारसंघासाठी होत असलेल्या मतदानासाठी यादी घोषित करण्यापूर्वीच या याद्या निवडणूक आयोग्याच्या पूर्व सूचनेनुसार वैध ठरण्याची प्रक्रिया राबविणे बंधनकारक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी दर तीन महिन्यांनी आपल्या स्थानिक मतदारांची यादी जिल्हाधिकाºयांना सादर करणे आवश्यक आहे. अशी यादी तयार करताना प्रत्येक मतदाराकडून निवडणूक आयोगाच्या नमुन्यातील फॉर्म १७ भरून घेणे आवश्यक आहे. तसेच निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी जिल्हाधिकाºयांनी पुन्हा अशाप्रकारे सर्व मतदारांकडून फॉर्म १७ भरून त्याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. मात्र, मतदार याद्या आता घोषित करताना असे झाले असेल तर दोन मतदारांचा प्रश्न निर्माण झाला नसता.निफाड नगरपंचायतीच्या मंगला वाघ यांचे ३० मार्च रोजी निधन झाले. त्यांची जागा रिक्त झाली आहे, तर दुसरीकडे कळवण पंचायत समितीचे सभापती आशा पवार यांच्यावर अविश्वास ठराव दाखल झाला होता. त्यामुळे त्यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांकडे राजीनामा दिला होता. मग असे असेल तर मतदार यादीतील ६४४ नावांच्या यादीत त्यांची नावे कशी काय आली? असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हाधिकाºयांनी आयोगाच्या सूचनेनुसार फॉर्म १७ भरून घेतले असते तर निफाड नगरपंचायतीच्या मुख्याधिकाºयांनी त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेने तसे कळविले असते. परंतु पडताळनीच न झाल्याने हा घोळ कायम असल्याचे दिसत आहे. विधान परिषद हे राज्य विधि मंडळाचे वरिष्ठ सभागृह असून, त्याच्या निवडणुका अत्यंत गांभीर्याने होणे अपेक्षित असताना मात्र तसे होताना दिसत नाही.