सिन्नर : येथील सरदवाडी रस्त्यावरील झापवाडी गावात शिंदे कुटुंबीयांनी उभारलेल्या वज्रेश्वरी माता मंदिराचे शुक्रवारी (दि. १५) कलशारोहण व वज्रेश्वरी मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या निमित्ताने तीन दिवसांपासून विविध धार्मिक कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.बुधवारी संतोष कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली मूर्तीस जलाधिनिवास विधी करण्यात आला. गुरुवारी सकाळी धान्यानिवास विधी करण्यात आला. त्यानंतर बिपीन मोरे, योगेश शिंदे, अविनाश गोळेसर, अमोल शिंदे, राजेंद्र झगडे, किशोर रसाळ, बाबूराव विसे, विलास गुरुळे आदिंच्या हस्ते सपत्नीक होमहवन करण्यात आले. शुक्रवारी सकाळी मूर्ती व कलशाची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर नाशिक येथील जनार्दन स्वामी मठाचे दयानंदगिरी महाराज यांच्या हस्ते कलशारोहण व मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. त्यानंतर महाप्रसादाने सोहळ्याची सांगता होणार आहे. याप्रसंगी पंचक्रोशीतील भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अंजनाबाई शिंदे, रमेश शिंदे, बाळासाहेब मोरे, मारुती विसे, अशोक मोरे, डॉ. संदीप मोरे, निवृत्ती झगडे, शंकर झगडे, एकनाथ गोळेसर, किशोर गोळेसर, ज्ञानेश्वर खापरे, एकनाथ कणकुसे, रामनाथ झगडे, मनोज शिंदे, विशाल शिंदे, पंकज मोरे, गणेश झगडे, सागर गोळेसर, संकेत ताठे, रतन शिंदे, सचिन शिंदे, मच्छिंद्र रसाळ, अरुण शिंदे, अमोल डावरे, विकी नवाळे, अक्षय रसाळ, दीपक भवर, अक्षय पवार, अभिषेक विसे, प्रदीप खापरे, अमोल फरताळे, संदीप झगडे आदींसह ग्रामस्थांनी केले आहे. (वार्ताहर)
वज्रेश्वरी मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा
By admin | Updated: April 14, 2016 23:21 IST