शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

वैष्णवांचा मेळा : भाविकांच्या मांदीयाळीने फुलला परिसरदातलीत रिंगण सोहळा

By admin | Updated: June 14, 2017 00:11 IST

वैष्णवांचा मेळा : भाविकांच्या मांदीयाळीने फुलला परिसरदातलीत रिंगण सोहळा

शैलेश कर्पे । लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : माउली.. माउली.. असा आकाशाला गवसणी घालणारा आवाज, टाळ-मृदंगांचा दमदार ठेका, भगव्या पताकांनी केलेली दाटी, मुखी ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’ असा नामजप करीत उत्साहपूर्ण, भक्तिमय व भारावलेल्या वातावरणात संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराज पालखीचा ‘रिंगण सोहळा’ सिन्नर तालुक्यातील दातली येथे पार पडला. नाशिक जिल्ह्यात झालेला रिंगण सोहळा डोळ्यांत साठविण्यासाठी वारकऱ्यांसह सुमारे ५० हजार वैष्णवांचा मेळा येथे भरला होता. त्र्यंबकेश्वर येथून निघालेल्या संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज पालखी सोहळ्याचा सोमवारी रात्री लोणारवाडी येथे मुक्काम झाला. त्यानंतर मंगळवारी सकाळी सिन्नर शहरात पायी दिंडी सोहळ्याचे आगमन झाले. दुपारी कुंदेवाडी येथे भोजन झाल्यानंतर दातली शिवारात रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. रिंगण सोहळ्यासाठी दातली शिवारात पालखी दुपारी ३ वाजता पोहचली. पालखी रथातून काढताच स्थानिक पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्यासह मान्यवरांनी पूजन केले. पालखी तळावर येताच सर्व आसमंत माउलीमय होऊन गेला होता. रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी रांगोळी काढून फुलांचा सडा टाकण्यात आला होता. सोहळ्यातील रिंगण पाहण्यासाठी परिसरातून भक्तीचा सागर लोटल्याचे चित्र होते. प्रत्येकजण हा क्षण आपल्या डोळ्यांत टिपण्यासाठी आतुर झाल्याचे दिसून येत होते. दुपारी ४ वाजता पूर्ण रिंगण लावून झाल्यानंतर जरीपटका निशाणाने रिंगणाभोवती फेऱ्या मारल्यानंतर अश्व वायुवेगाने धावू लागताच भाविकांनी ‘माउली माउली’ नामाचा एकच गजर केला. टाळ्यांच्या कडकडाटात अश्वाने फेऱ्या पूर्ण केल्या. यावेळी वारकऱ्यांमधून टाळ-मृदंगांच्या निनादाने सारे आसमंत दुमदुमून गेले होते. पारणे फेडणारा हा क्षण उपस्थित भाविकांनी आपल्या डोळ्यांत साठवून ठेवला. यावेळी पालखीमालक मोहन महाराज बेलापूरकर, बाळकृष्ण महाराज डावरे, महामंडलेश्वर रामकृष्ण महाराज लहवीतकर, मोहन जाधव, संस्थानचे अध्यक्ष संजय धोंडगे, भगीरथ महाराज काळे, एकनाथ महाराज गोळेसर, पंडित महाराज कोल्हे, माधव महाराज पाटील, योगेश महाराज आव्हाड, एकनाथ भाबड, सागर महाराज मुठाळ, त्र्यंबक महाराज गायकवाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. संस्थानचे अध्यक्ष संजय धोंडगे यांनी रिंगण सोहळ्याचे सुयोग्य नियोजन केल्याबद्दल दातली ग्रामस्थांचे आभार मानले.