शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वैशाली झनकर यांचा ‘वीक-एण्ड’ कारागृहातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:19 IST

नाशिक : शिक्षणसंस्थांच्या शाळांना मंजूर झालेल्या वीस टक्के अनुदानानुसार वेतन सुरू करण्याचा कार्यादेश काढण्यासाठी आठ लाखांची लाच स्वीकारताना ...

नाशिक : शिक्षणसंस्थांच्या शाळांना मंजूर झालेल्या वीस टक्के अनुदानानुसार वेतन सुरू करण्याचा कार्यादेश काढण्यासाठी आठ लाखांची लाच स्वीकारताना सापडलेल्या संशयित माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर प्रकरणाची सुनावणी सोमवारपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याने झनकर यांचा कारागृहातील मुक्काम आणखी दोन दिवसांसाठी वाढला आहे.

शिक्षकाच्या वेतन कार्यादेश मान्यता प्रकरणात माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांच्यासह साथीदार शिक्षक पंकज दशपुते व चालक ज्ञानेश्वर येवले यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे पथकाने पकडले होते. या प्रकरणात न्यायालयाने बुधवारी झनकर यांचे साथीदार शिक्षक पंकज दशपुते व चालक ज्ञानेश्वर येवले यांना जामीन मंजूर केला असून त्यांची कारागृहातून सुटका झाली आहे. तर झनकर यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी होणार होती; परंतु ही सुनावणी सोमवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे झनकर यांना आणखी दोन दिवस जामिनासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. दरम्यान, डॉ. वैशाली झनकर यांच्याविरोधात लाचप्रकरणी गुन्हा दाखल होऊन त्यांची प्रथम पोलीस कोठडी अन् नंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आल्याने शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांनी त्यांच्या निलंबनाचा अहवाल शासनाला पाठविला आहे; परंतु जवळपास आठवडाभराचा कालावधी उलटूनही शासनाकडून अद्याप झनकर यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. विशेष म्हणजे शिक्षण उपसंचालकांनी प्राथमिक अहवालानंतर एक स्वतंत्र पत्र पाठविले आहे. त्यानंतर अद्ययावत अहवाल सादर करताना कारवाईत होणाऱ्या दिरंगाईमुळे शिक्षण विभागाची प्रतिमा मलिन होत असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आल्यानंतरही झनकर यांंच्यावर अद्याप कारवाई झालेली नाही. त्यामुळे डॉ. वैशाली झनकर प्रकरणात शासनाच्या भूमिकेकडे संपूर्ण शैक्षणिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.