शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

डांगसौदाणे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी वैशाली बधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 19:09 IST

डांगसौंदाणे : येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी वैशाली पंकज बधान यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्देआवर्तनानुसार राजीनामा दिल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर उपसरपंचपदी निवड

डांगसौंदाणे : येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी वैशाली पंकज बधान यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.येथील ग्रामपंचायतीवर संजय सोनवणे यांच्या जलदुर्गा पॅनलचे वर्चस्व असून, उपसरपंच विजय सोनवणे यांनी आवर्तनानुसार राजीनामा दिल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर उपसरपंचपदी निवड करण्यासाठी सरपंच जिजाबाई पवार यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात बैठक बोलविण्यात आली होती. यावेळी उपसरपंच पदासाठी वैशाली बधान यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच जिजाबाई पवार यांच्या हस्ते नविनर्वाचित उपसरपंच वैशाली बधान यांचा सत्कार करण्यात आला.येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीत संजय सोनवणे यांच्या जलदुर्गा पॅनलने दहा पैकी सात जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळविले असून, यावेळी सर्व सदस्याशी चर्चा करु न उपसरपंच पदासाठी वैशाली बधान यांच्या नावावर सर्वाचे एकमत झाल्याने सोनवणे यांचा अर्ज दाखल करण्यात आला. त्यांना सुचक म्हणून सुशिल सोनवणे तर अनुमोदक म्हणून विजय सोनवणे यांनी स्वाक्षरी केली. विहित वेळेत बधान यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची उपसरपंचपदी एकमताने निवड करण्यात आल्याची घोषणा निवडणुक निर्णय अधिकारी संदीप भामरे यांनी केली.यावेळी ग्रामपंचायत सदस्य विजय सोनवणे, सुशिल सोनवणे, यशोदा सोनवणे, लता वाघ, वत्सला पवार, रामदास पवार, डोंगर माळी, पमा सोनवणे, धाकु मोरे आदी हजर होते.