शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
3
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
4
आव्हान स्वीकारले! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाहीर चर्चेला राहुल गांधी तयार
5
“शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमिष दाखविण्याचा मोदींचा प्रयत्न”; काँग्रेसचा आरोप 
6
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल
7
तीन टप्प्यांत कोणत्या पक्षाने घेतल्या सर्वाधिक सभा? मोदी, शाह, राहुल यांचा झंझावाती प्रचार
8
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
9
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
10
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
11
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
12
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
13
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
14
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
15
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
16
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
17
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
18
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
19
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
20
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   

वैशाली भोसले विजयी : सेनेच्या चव्हाण, भाजपाच्या लोणारी पराभूत पोटनिवडणुकीत मनसेची बाजी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2018 1:14 AM

नाशिक : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३(क) या महिलांसाठी राखीव रिक्त जागेसाठी शुक्रवारी (दि.६) झालेल्या पोटनिवडणुकीत मनसेने जागा राखली.

ठळक मुद्देइंजिनने दुसºया फेरीपासून धरलेला सुसाट वेग पाचव्या फेरीपर्यंत कायम शुक्रवारी झालेल्या मतदानात मतदारांचा फारसा उत्साह नव्हताच

नाशिक : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३(क) या महिलांसाठी राखीव रिक्त जागेसाठी शुक्रवारी (दि.६) झालेल्या पोटनिवडणुकीत मनसेने जागा राखली असून, या पक्षाच्या उमेदवार अ‍ॅड. वैशाली मनोज भोसले यांनी दोन हजारांहून अधिक मतांनी शिवसेनेच्या डॉ. स्नेहल चव्हाण यांचा पराभव केला. शनिवारी झालेल्या मतमोजणीत अ‍ॅड. भोसले यांना ७ हजार ४५३ मते मिळाली, तर सेनेच्या डॉ. स्नेहल संजय चव्हाण यांना ५ हजार १३१ मते मिळाली. म्हणजेच एकूण २ हजार ३२२ मताधिक्क्यांनी अ‍ॅड. भोसले विजयी झाल्या. भाजपाच्या उमेदवार विजया लोणारी तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या. त्यांना ४ हजार ८१० मते मिळाली. भोसले यांच्या विजयाने मनसेने पुन्हा या प्रभागाचा गड राखण्यात यश मिळविले. मनसेच्या इंजिनने दुसºया फेरीपासून धरलेला सुसाट वेग पाचव्या फेरीपर्यंत कायम राहिल्याने सेना-भाजपाचा धुव्वा उडाला. प्रभाग १३ (क) मधील मनसेच्या नगरसेवक सुरेखा भोसले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. शुक्रवारी झालेल्या मतदानात मतदारांचा फारसा उत्साह नव्हताच. या निवडणुकीसाठी अवघे ३९.७१ टक्के मतदान होऊ शकले. त्यामुळे बदलाला अनुकूल मतदान नसल्याचे संकेत बांधले जात होते. प्रत्यक्षात तसेच स्पष्ट करणारा निकाल लागला आहे. शनिवारी (दि.७) गंगापूररोडवरील शिवसत्य मंडळाच्या सभागृहात मतमोजणीला प्रारंभ करण्यात आला. पहिल्या फेरीत चव्हाण यांना ६९५, तर भोसले यांना ३७३ मते होती. मात्र दुसºया फेरीत भोसले यांनी आघाडी घेत ६७७, तर चव्हाण यांना ३४० मते मिळाली. सहाव्या फेरीत भोसले यांना एक हजार १६१, तर चव्हाण यांना ३४५ मते मिळाली. या फेरीपासून भोसले यांनी घेतलेली आघाडी अखेरच्या फेरीपर्यंत कायम राहिली.विजयानंतर भोसले भावुकमतमोजणीची अकरावी फेरी पूर्ण झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाºयांनी निकाल जाहीर करत अ‍ॅड. वैशाली भोसले यांना सर्वाधिक ७४५३ मते मिळाल्याचे सांगत विजयी घोषित केले. यावेळी निकाल ऐकून भोसले आपल्या सासू दिवंगत सुरेखाताई भोसले यांच्या आठवणींनी भावुक झाल्या. त्यांना अश्रू अनावर झाले. त्यांचे काका माजी आमदार नितीन भोसले यांच्या गळ्यात पडून अश्रूंना वाट मोकळी करून दिली. त्यांना रडताना बघताना उपस्थित कार्यकर्त्यांमध्येही चलबिचल होऊन काही काळ उत्साह मावळला. रविवार कारंजा परिसरातील मितभाषी व सदैव जनतेच्या कामासाठी धावून जाणाºया लोकप्रतिनिधी म्हणून दिवंगत सुरेखाताई परिचित होत्या.