शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

वंचित बहुजन आघाडीतर्फे येवला तहसीलवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 19:05 IST

येवला : जगातील अनेक लोकशाही देशांनी इव्हीएम मशीन नाकारले असतांना सर्वश्रेष्ठ संविधानामुळे समृद्ध असलेल्या भारत देशात वंचित बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व नाकारणाऱ्या प्रस्थापित सरकारने इव्हीएम मशीनचा स्वीकार केला आहे,असा आरोप करीत आगामी सार्वत्रिक निवडणुका या बॅलेट पेपरवर घेण्यात यावीया मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे भारतीय रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब अहिरे यांच्या नेतृत्वाखाली येवला तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.यावेळी इव्हीएम हटाव, देश बचाव घंटानाद आंदोलन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशाने करण्यात आले.

राज्यातील सर्व ४८ मतदारसंघामध्ये एकूण झालेले मतदान आणि प्रत्यक्ष मोजणी केलेले मतदान यामध्ये तफावत आढळून येत आहे. २२ मतदारसंघामध्ये मतदान करणाऱ्यांची संख्या मोजण्यात आलेल्या मतांपेक्षा कमी आहे.उर्वरित २६ मतदार संघामध्ये मतदान करणा-यांची संख्या मोजण्यात आलेल्या मतांपेक्षा जास्त आहे.निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरील माहितीच्या आकडेवारीमध्ये तफावत आढळून आली आहे.तहसीलप्रांगणात बोलताना भाऊसाहेब अहिरे यांनी सांगितले की ,प्रत्यक्ष झालेले मतदान आणि मोजण्यात आलेल्या मतांच्या संख्येमध्ये तफावत येण्याचे नेमके कारण काय ? याचे निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दयावे. आगामी निवडणुका या बॅलेट पेपरवर घेण्यात यावी.यावेळी शहराध्यक्ष संदिप जोंधळे,विलास देहाडे, भानुदास पठारे,सविता धिवर,रेखाताई साबळे,भगवान रसाळ,गौतम घोडेराव,हमजा भाई,दयानंद जाधव,अविनाश धिवर ,समाधान धिवर,अशोक घोडेराव,शेरु भाई मोमीन, पंचम साळवे, प्रभाकर गायकवाड, संजय गरु ड, सिद्धार्थ निकम, ज्योती जगताप, नसीम शहा, शेहनज अजगर शहा,आशाबाई गुंजाळ,जयप्रकाश वाघ, पोपट वाघ आदींसह वंचित बहुजन आघाडी,भारिप बहुजन महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.सदर घंटानाद आंदोलनास काँग्रेसचे शहराध्यक्ष नानासाहेब शिंदे, लालसेनाचे प्रदेशाध्यक्ष कॉ. जितेंद्र गायकवाड,भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब जाधव,रिपब्लिकन सेनेचे दिपक लाठे, छावा लभान क्र ांतीवीर सेनेचे प्रदेशाध्यक्ष मयराम नवले,एम आय एमचे कार्यकर्ते जमील पटेल,शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष श्रावण देवरे यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Politicsराजकारण