शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वेतन कराराबाबत दिवाळीपर्यंत निर्णय घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 01:17 IST

गेल्या सहा महिन्यांपासून एस.टी. कर्मचाºयांच्या वेतनाबाबतचा प्रश्न निर्माण झाला असून, कर्मचाºयांना वेतन आयोग लागू होणार की करार केला जाणार याकडे कर्मचाºयांचे लक्ष लागलेले असताना परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी कामगार संघटनेला हट्ट सोडण्याचे आवाहन करीत दिवाळीपर्यंत कराराबाबतचा निर्णय घ्या, असे अल्टिमेटम दिले.

नाशिक : गेल्या सहा महिन्यांपासून एस.टी. कर्मचाºयांच्या वेतनाबाबतचा प्रश्न निर्माण झाला असून, कर्मचाºयांना वेतन आयोग लागू होणार की करार केला जाणार याकडे कर्मचाºयांचे लक्ष लागलेले असताना परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी कामगार संघटनेला हट्ट सोडण्याचे आवाहन करीत दिवाळीपर्यंत कराराबाबतचा निर्णय घ्या, असे अल्टिमेटम दिले. मेळा स्थानकातील बसपोर्ट कामाच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात परिवहनमंत्री दिवाकर रावते बोलत होते. एस.टी. कर्मचाºयांचा वेतन करार संपल्यानंतर अद्याप नवीन करार झालेला नाही. कर्मचाºयांच्या वेतनाबाबत महामंडळ प्रशासन आणि एस. टी. कामगार संघटना यांना निर्णयाचा अधिकार आहे. परंतु यंदा कामगार संघटनेने करार नको तर राज्य सरकारी कर्मचाºयांप्रमाणेच एसटीतील कर्मचाºयांनाही सातवा वेतन आयोग लागू करावा, अशी भूमिका घेतली आहे. तर उर्वरित १३ संघटनांनी कराराला तयारी दर्शविली आहे. या वादामुळे अद्यापही कर्मचाºयांच्या वेतनाबाबतचा निर्णय होऊ शकलेला नाही. परिवहनमंत्री रावते नाशिकमध्ये नेमके काय भूमिका मांडतात याकडे तमाम एस. टी. कामगारांचे लक्ष लागले होते. यावेळी रावते यांनी सांगितले की, कराराबाबत दिवाळीपर्यंत सकारात्मक निर्णय घ्या, योग्य निर्णय घेतल्यास कुणीही निराश होणार नाही, कुणालाही कमी पडू देणार नाही; मात्र हट्ट करू नका. हट्ट केला तर सरकारकडे हक्काने काहीच मागता येणार नाही. कर्मचाºयांच्या मेहनतीचा सन्मान झालाच पाहिजे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.महामंडळ तोट्यात असताना महामंडळाने शेतकºयांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री निधीसाठी पाच कोटी रुपये निधी दिल्याची घोषणा केली होती. यासाठी आता कर्मचाºयांच्या वेतनातून कपात होणार अशी चर्चा कामगारांमध्ये असतानाच रावते यांनी याचा बोजा कर्मचाºयांवर पडणार नसल्याचे जाहीर करून कर्मचाºयांना दिलासाही दिला.रावतेंची नाराजीराज्यातील महत्त्वाकांक्षी बसपोर्ट कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेल्या मंडपाविषयी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी महामंडळाच्या अधिकाºयांविषयी नाराजी व्यक्त केली.