शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वडनेरभैरवला मटका अड्ड्यावर छापा चौघावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 22:36 IST

चांदवड : तालुक्यातील वडनेरभैरव येथे बेकायदेशीर मटका अड्ड्यावर मालेगाव येथील विशेष पोलीस पथकाने छापा टाकून सुमारे एक लाख पाच हजार सातशे रुपये किमतीचा ऐवज जप्त केला. तर तीन जणांना ताब्यात घेतले आहे व एक जण फरार आहे.

ठळक मुद्दे वडनेरभैरव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चांदवड : तालुक्यातील वडनेरभैरव येथे बेकायदेशीर मटका अड्ड्यावर मालेगाव येथील विशेष पोलीस पथकाने छापा टाकून सुमारे एक लाख पाच हजार सातशे रुपये किमतीचा ऐवज जप्त केला. तर तीन जणांना ताब्यात घेतले आहे व एक जण फरार आहे.मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थापन केलेल्या विशेष पथकातील कल्पेशकुमार चव्हाण, अभिजित साबळे, दिनेश शेरावते, मिलिंद पवार यांनी दिनांक ०५/०९/२०१९ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास मिळालेल्या बातमीनुसार केलेल्या छापा कारवाईत वडनेरभैरव पोलिस ठाणे हद्दीत भैरव शिवारातील गावठाण येथे लक्ष्मण चारोसे यांच्या पेरूच्या शेतात मोकळ्या जागी संतोष कारभारी महिले वय ३५, रा. भयाळे, ता. चांदवड (मटका लिहीणार), उत्तम शंकर पवार वय-२९, रा. वडनेरभैरव, तालुका चांदवड (मटका खेळणार) अशोक पातीलबा जगताप वय ४८, रा. खडकजांब, ता. चांदवड, नागेश लक्ष्मण जंगम रा. वडनेरभैरव, ता. चांदवड (फरार मटका मालक)असे बेकायदेशीर अवैधरीत्या स्वत:च्या फायद्यासाठी कल्याण नावाच्या मटका जुगारावर लोकांकडून अंक आकडे पैसे लावून घेऊन खेळताना व खेळविताना रोख रक्कम २२७००/- रुपये, ३ मोबाइल, १३०००/- रुपये व ३ दुचाकी मोटारसायकल ७००००/- रु पये असा एकूण १ लाख ५ हजार ७००/- रुपये किंमतीच्या मटका जुगाराच्या साहित्यासह मिळून आले आहेत. म्हणून त्यांच्याविरुद्ध वडनेरभैरव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.