शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
4
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
5
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
6
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
7
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
8
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
9
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
10
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
11
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
12
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
13
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
14
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
15
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
16
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
17
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
18
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
19
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
20
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल

वडझिरेच्या सरपंचपदी अंबादास बोडके बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 00:11 IST

वडझिरे : सिन्नर तालुक्यातील वडझिरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अंबादास बोडके यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

ठळक मुद्दे बोडके यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखलग्रामस्थांच्या हस्ते हार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार

वडझिरे : सिन्नर तालुक्यातील वडझिरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अंबादास बोडके यांची बिनविरोध निवड करण्यात आली.सरपंच संजय नागरे यांनी सहकारी सदस्यांना संधी मिळावी म्हणून सुमारे दोन महिन्यांपूर्वी सरपंचपदाचा राजीनामा दिला होता. सरपंचपदाच्या निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी एम. एन. गाडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. सरपंचपद इतर मागास प्रवर्गासाठी राखीव असल्याने या जागेसाठी अंबादास बोडके यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. या अर्जावर सूचक म्हणून संजय नागरे यांनी स्वाक्षरी केली होती. नऊ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायत सदस्यांमध्ये एक सदस्य गैरहजर राहिले. सरपंचपदासाठी बोडके यांचा एकमेव अर्ज आल्याने बिनविरोध निवडीची घोषणा निवडणूक अधिकाºयांनी केली. सुमारे अडीच वर्षांपूर्वी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत पॅनलचे नेतृत्व करणारे सामाजिक कार्यकर्ते अर्जुन बोडके, भीमराव दराडे, वसंत बोडके, आर. बी. बोडके व विलास बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीच्या सर्व जागा निवडून आणून ग्रामपंचायतीवर निर्विवाद बहुमत प्रस्थापित केले होते. अडीच वर्षांनंतर सरपंचपदात फेरबदल करून सहकारी सदस्यास संधी देण्यात आली. सरपंचपदी अंबादास बोडके यांची निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या हस्ते हार व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपसरपंच छाया नागरे, मावळते सरपंच संजय नागरे, ग्रामपंचायत सदस्य अलका बोडके, रेखा बोडके, शोभा बोडके, मंदा ठोंबरे, तुषार अांबेकर आदींसह ग्रामस्थ शिवाजी बोडके, विलास बोडके, फकीरा दराडे, तुकाराम शेळके उपस्थित होते.