इन्फो
सिन्नर अजूनही हॉटस्पॉटच
जिल्ह्यात सिन्नर तालुका वगळता अन्य तालुक्यांत कोरोना बव्हंशी नियंत्रणात येत आहे. मात्र, सिन्नरमधील संसर्ग थांबण्याची नावे घेईना. शनिवारी सिन्नर तालुक्यात तब्बल २०४ रुग्ण उपचार घेत होते. त्याखालोखाल निफाड तालुक्यात ७२ रुग्ण उपचार घेत आहेत. सद्य:स्थितीत नाशिक-२५, बागलाण -२७, चांदवड-३९, देवळा-१७, दिंडोरी-१२, इगतपुरी- १०, कळवण-९, मालेगाव -१५, नांदगाव - १६, निफाड-७२, पेठ-१, सुरगाणा - १, त्र्यंबकेश्वर -४, येवला - ४९ याप्रमाणे रुग्ण उपचार घेत आहेत.
इन्फो
जिल्ह्यात ८६२ रुग्णांवर उपचार
जिल्ह्यात कोरोना बाधित ८६२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. ग्रामीण भागात अजूनही रुग्णसंख्या समाधानकारक घटलेली नाही. ग्रामीण भागात प्रतिदिन ५० हून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. नाशिक शहरात तर शनिवारी बऱ्याच दिवसांनंतर अवघे १७ रुग्ण आढळून आले. त्यामुळे शहर कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत असल्याचे दिसून येत आहे. गणेशोत्सवावर शासनाने निर्बंध घातले असल्याने अनेक मंडळांनी साधेपणाने गणेश प्रतिष्ठापना केली असून गर्दी टाळली जात आहे.