पहिल्या टप्प्यापासून चांदोरी प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू होते, मात्र गोदाकाठ परिसरातील २० ते ३० गावांतील नागरिकांना लसीकरणासाठी येणे शक्य नव्हते, तर काही नागरिक उशिरा येऊन पोहोचत होते. त्यावर तोडगा काढण्यासाठी
नागरिक, जि.प सदस्य सिद्धार्थ वनारसे व वैद्यकीय अधिकारी यांनी आरोग्य विभागाकडे लसपुरवठा वाढून मागितला व प्राथमिक आरोग्य केंद्राचे उपकेंद्र असलेले चाटोरी, सायखेडा येथे लसीकरण सुरू करण्यात आले. या दोन उपकेंद्रांतर्गत शेकडो नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.
चितेगाव येथील उपकेंद्रात शनिवारी लसीकरण झाले. यामध्ये १५० हून अधिक नागरिकांंनी लस घेतली. चितेगाव येथील लसीकरण प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. मुकुंद सवाई, अरुण कहांडळ, सुवर्णा देवरे, प्रमिला परदेशी, हरीश आवारे, अमोल नाठे, सरपंच सुभाष गाडे, सदस्य केशव गाडे, सुनील भंबारे, कपिल पवार आदी उपस्थित होते.