शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

मोक्का न्यायलयाच्या आदेशान्वये रवी पुजारीचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:18 IST

ठळक मुद्दे 1) सेनेगल देशात होता वास्तव्यास 2) पुजारी न्यायालयात म्हणाला ''मी भारताचा नागरिक नाही'' नाशिक : कुख्यात ...

ठळक मुद्दे

1) सेनेगल देशात होता वास्तव्यास

2) पुजारी न्यायालयात म्हणाला ''मी भारताचा नागरिक नाही''

नाशिक : कुख्यात गॅंगस्टर रवी पुजारीला मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी (दि.२९) नाशिकच्या विशेष मोक्का न्यायालयात त्यास हजर केले. न्यायालयाने त्यास न्यायलायीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. यावेळी पुजारीचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण झाले नसल्याचे तपासी अधिकाऱ्यांनी न्यायालयाला सांगितले आणि त्याच्याकडे आधारकार्डदेखील नसल्याची बाब यावेळी न्यायालयापुढे आणली. यामुळे पुजारीचे लसीकरण करायचे कसे? असा पेच निर्माण झाला असता न्यायालयाने स्वतंत्र आदेश काढून पुजारीला कोरोना प्रतिबंधक लस देऊन मगच तुरुंगात न्यावे, असे सांगितले. त्याआधारे त्याचे नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात लसीकरण करण्यात आले.

खंडणी वसुलीसाठी दहा वर्षांपूर्वी नाशकात गोळीबार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या कुख्यात रवी पुजारीला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. सात दिवसांची पोलीस कोठडी पूर्ण झाल्याने त्यास न्यायालयात उभे करण्यात आले होते. दरम्यान, कोरोनाचा फैलाव लक्षात घेता सुरक्षेच्या कारणास्तव ऑर्थररोड कारागृह प्रशासनाने पत्र देत पुजारीचे लसीकरण झाले नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्याला कारागृहात दाखल करून घेण्यास अडचण निर्माण होईल. तत्पूर्वी लसीकरण केले जावे असे पत्रात म्हटले होते. तपासी अधिकाऱ्यांनी हे पत्र न्यायालयात सादर केले. कोविड लस घेण्यासाठी ऑनलाइन पोर्टलवर आधारकार्ड व मोबाइल क्रमांक लिंक करणे गरजेचे आहे आणि रवी पुजारीकडे आधारकार्डच नसल्याने त्याला लस कशी द्ययाची? असा प्रश्न पोलिसांना पडला होता. कारण कारागृह प्रशासनाच्या पत्रानुसार लसीकरण झाल्याशिवाय पुजारीला कारागृहात प्रवेश मिळणार नव्हता. पुजारीच्या लसीकरणाचा हा पेच नाशिकच्या विशेष मोक्का न्यालायाने लसीकरणाचे स्वतंत्र आदेश करत सोडविला.

--------

इन्फो

---

जिल्हा शासकीय रुग्णालयात दिली लस

आधार कार्ड रवी पुजारीकडे नसल्याने यंत्रणेपुढे पेच निर्माण झाला होता. त्यामुळे न्यायालयाने पुजारीला आधारकार्डबाबत विचारणा केली असता त्याने ''मी भारताचा नागरिक नाही, मी सेनेगलमध्ये वास्तव्यास होतो. माझ्याकडे 'आधारकार्ड'सारखे कुठलेही कागदपत्र नाही'' असे न्यायालयाला सांगितले. न्यायालयाच्या स्वतंत्र आदेशानुसार जिल्हा शासकीय रुग्णालयात रवी पुजारीला कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आणि तेथून त्याचा मुंबईच्या ऑर्थररोड कारागृहाच्या दिशेने कडेकोट बंदोबस्तात प्रवास सुरू झाला.