शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

परदेशी जाणाऱ्या ५८५ विद्यार्थ्यांना लसींचे संरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:10 IST

नाशिक : परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांचे जुलै-ऑगस्टमध्ये शैक्षणिक सत्र सुरू होत असते. परंतु आता लस घेतल्याशिवाय त्यांना ...

नाशिक : परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांचे जुलै-ऑगस्टमध्ये शैक्षणिक सत्र सुरू होत असते. परंतु आता लस घेतल्याशिवाय त्यांना परवानगी दिली जाणार नसल्याने अशा परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विशे‌ष लसीकरण मोहिमेत ५८५ विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. जिल्ह्यातून परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. काही प्रथमच परदेशात जाणार आहेत तर काही विद्यार्थी सुटीत नाशिकमध्ये आले होते, मात्र कोरेानाच्या निर्बंधामुळे त्यांना परदेशात जाता आले नव्हते. अशा विद्यार्थ्यांना कोविशिल्ड लसीचे संरक्षण देण्यात आले आहे. परदेशात या लसीला मान्यता देण्यात आलेली असल्यामुळे अशी लस घेणाऱ्यांना पुढील डोस परदेशातदेखील मिळणार आहे.

जिल्हा प्रशासनाकडून राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत नाशिक शहर आणि जिल्ह्यातील एकूण ५८५ विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. कोरोनामुळे सर्वत्र लसीकरणाला प्राधान्य दिले जात आहे. ज्यांनी लसींचे डोस घेतले आहेत अशांनाच केवळ देशात प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे परदेशात जाणाऱ्यांना लस घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील कालिसाद कलामंदिर येथे परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबविली.

परदेशात जाणाऱ्यांना कोविशिल्ड लस देण्यात येत आहे. परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलियात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. तेथील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून त्यांचे शैक्षणिक सत्र पुढील महिन्यापासून सुरू होत आहे. या विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.

--इन्फो--

परदेशी जाणाऱ्या नोकरदारांचेही लसीकरण--

विद्यार्थ्यांच्या लसीकरणाबरोबरच नोकरीनिमित्ताने परदेशात वास्तव्यास असलेल्या सुमारे ५० नागरिकांनादेखील कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा डोस देण्यात आला आहे. त्यामुळे परदेशी जाणाऱ्या एकूण ६३५ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. या सर्वांना कोविशिल्ड लस देण्यात आल्याने परदेशात त्यांना या लसीचा दुसरा डोस घेता येणार आहे.