शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरण केवळ तरुणाईला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:10 IST

नाशिक : शहरासह जिल्ह्यातदेखील लसीकरणाचा वेग प्रचंड मंदावला असून लसच उपलब्ध होत नसल्याने शहरातील २९ पैकी केवळ २ केंद्रांवर ...

नाशिक : शहरासह जिल्ह्यातदेखील लसीकरणाचा वेग प्रचंड मंदावला असून लसच उपलब्ध होत नसल्याने शहरातील २९ पैकी केवळ २ केंद्रांवर नागरिकांना लस मिळू शकली. तीदेखील केवळ १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांनाच लस मिळू शकली. दरम्यान लसींचा साठाच अत्यल्प असल्याने सोमवारीदेखील केवळ दोनच केंद्रांवर लस मिळू शकणार आहे.

जिल्ह्यात २२४ केंद्रांवर लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, त्यातील केवळ मोजक्याच केंद्रांवर लस मिळू शकली.

लसीकरणासाठी १८ वर्षे वयोगटावरील सर्व नागरिकांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे लस घेण्यासाठीच्या इच्छुक नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र, मनपा प्रशासन आणि जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेकडे पुरेशा प्रमाणात लसींचा साठाच उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत नागरिकांनी नोंदणी केली तरी लसच उपलब्ध नसल्याने लसीकरणाची संपूर्ण प्रक्रिया मंदावली आहे. नाशिक शहरात सोमवारीदेखील केवळ पंचवटीचे इंदिरा गांधी रुग्णालय आणि खोले मळ्यातील रुग्णालयातच लसीकरण प्रक्रिया सुरू राहू शकणार आहे. हे लसीकरणदेखील केवळ १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांनाच मिळणार आहे. दरम्यान नाशिक शहराला केवळ ४ हजार लसींचा साठा उपलब्ध झाला असून हा साठा अवघ्या तीन दिवसांतच संपुष्टात येण्याची शक्यता आहे. थोड्याफार लस विविध केंद्रांवर उपलब्ध असल्या तरी त्या एकत्रित करून एक किंवा दोन केंद्रांवरच दुसरी लस उपलब्ध होऊ शकणार आहे.