शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात लसीकरणाने ओलांडला १८ लाखांचा टप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:16 IST

नाशिक : शहरातील विविध केंद्रांवर मंगळवारी झालेल्या सुमारे ३० हजार लसीकरणाने जिल्ह्यातील १८ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. जास्तीत जास्त ...

नाशिक : शहरातील विविध केंद्रांवर मंगळवारी झालेल्या सुमारे ३० हजार लसीकरणाने जिल्ह्यातील १८ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी प्राप्त लसींचे नियोजन केले जात असल्यामुळे ग्रामीण भागातील लसीकरणाचा टक्का देखील वाढला असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्याच्यादृष्टीने जिल्ह्यात लसीकरणाचे नियोजन करण्यात येत असून पंधरा तालुके आणि दोन महापालिका क्षेत्रात असलेल्या लोकसंख्येनुसार लसींचे वाटप केले जात आहे. जास्तीत जास्त केंद्रांवर लस पोहोचावी त्यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आल्या असून त्यानुसार शहर आणि ग्रामीण भागातील लसीकरण सुरू आहे.

मंगळवारी झालेल्या ३०,९३६ लसीकरणामुळे जिल्ह्यातील एकूण लसीकरणाचा आकडा १८ लाख १३ हजार ४०२ इतका पोहोचला आहे. यामध्ये पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या १३ लाख ६३ हजार ४१८ इतकी आहे तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ४ लाख ४९ हजार ९८४ इतकी आहे. जिल्ह्यात कोविशिल्डचा पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने कोविशिल्ड लस घेतलेल्यांची संख्या अधिक आहे. पहिल्या डोसनंतर ८४ दिवसांनंतर दुसरा डोस दिला जातो. परंतु या कालावधीत लस उपलब्ध होत नसल्याने अनेकांना विलंब देखील होत आहे. त्यामुळे शक्यतो दुसरा डोस पूर्ण करण्याला प्राधान्य देण्यात येत असल्याने दुसऱ्या डोसची संख्या देखील वाढत आहे.

शहरी भागातील नागरिकांमध्ये लसीबाबत जनजागृती झाली असल्याने शहरातील लसीकरणाची आकडेवारी मोठी आहे. मात्र, आता ग्रामीण भागात देखील लसीकरणाला वेग आला आहे. गेल्या २० ते २५ जुलै या कालावधीत ग्रामीण भागातील लसीकरण हे शहरीभागापेक्षा अधिक असल्याचे दिसून आले आहे. ग्रामीण भागातील लसीकरणावर देखील लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील लसीकरणाला वेग मिळावा यासाठी जिल्हा प्रशासनाकडून अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढर यांच्याकडून याबाबतचा आढावा घेतला जात असून लसीकरणाचे नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ लसीकरण वितरणाचे नियोजन करीत आहेत. जिल्ह्यात लसीकरण केंद्रांची संख्या मोठी असल्याने जास्तीत जास्त केंद्रांना लस देण्याच्यादृष्टीने नियोजन केले जात आहे.

--इन्फो--

जिल्ह्यातील एकूण लसीकरण

१८,१३,४०२

पहिला डोस

१३,६३,४१८

दुसरा डोस

४, ४९,९८४