शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

डोस संपल्याने शहरातील लसीकरण ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 01:26 IST

नाशिक- शहरातील नागरिकांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा उत्साह असला तरी प्रत्यक्षात मात्र अपुऱ्या पुरवठ्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. अपुऱ्या लस ...

ठळक मुद्देनागरिक डोस न घेताच परत : आज सायंकाळपर्यंत पुरवठा होणार

नाशिक- शहरातील नागरिकांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा उत्साह असला तरी प्रत्यक्षात मात्र अपुऱ्या पुरवठ्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. अपुऱ्या लस पुरवठ्यामुळे बहुतांश ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आणि व्याधिग्रस्त नागरिकांना केंद्रांवरून परत जावे लागले. नाशिक शहरातील बिटको आणि पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालय वगळता अन्य बहुतांश केंद्रे बंद ठेवावी लागली. दरम्यान, कोविशिल्डचे दीड लाख डोस मागवण्यात आले असून, त्यातील काही डोस शुक्रवारी (दि.१९) प्राप्त होतील. त्यामुळे शनिवार व रविवार असे दोन दिवस सुटीच्या दिवशीही लसीकरण पुन्हा सुरू होऊ शकेल, असे सांगण्यात आले.१६ जानेवारीपासून कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड अशा दोन लसी सर्वप्रथम शासकीय व खासगी क्षेत्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्याचे ठरविण्यात आले होते. त्यावेळी काहींनी रिॲक्शनच्या भीतीने नकार दिला होता. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात फ्रंट वर्कर्स म्हणजेच पोलीस आणि अन्य महापालिका, नगरपालिका कर्मचाऱ्यांना लस देण्याचे नियोजन करण्यात आले तर, तिसऱ्या टप्प्यात १ मार्चपासून ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांपेक्षा जास्त परंतु ज्यांना हृदयरोग, रक्तदाब, मूत्रपिंड विकार आहेत अशांनाच नोंदणी करून लस देण्यात येत आहे. सुरुवातीला अनेकांना लसीविषयी शंका असली तरी आता मात्र कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता सर्वच नागरिक लस घेण्यास उत्सुक असताना दुुसरीकडे मात्र गेल्या तीन ते चार दिवसापासून लस संपल्याचे कारण सांगून ज्येष्ठ नागरिकांना परत पाठविले जात आहे. गुरुवारी(दि.१८)देखील लस संपल्याचे सांगून अनेकांना परत माघारी फिरावे लागले.यासंदर्भात आयुक्त कैलास जाधव यांनी कोविशिल्डच्या लस संपल्याचे सांगून दीड लाख लस यापूर्वीच मागविल्याचे स्पष्ट केले. मात्र, यातील काही डोस शुक्रवारी (दि.१९) येणार असून, ते वितरित करण्यास संपूर्ण दिवस जाणार असल्याने शनिवारी (दि. २१) लसीकरण करता येऊ शकेल, असे सांगितले.कोव्हॅक्सिन लसआणखी २४ खासगी रुग्णालयात लसीकरणनाशिक शहरात लसीकरणासाठी सुमारे ३६ केंद्रे आहेत. यात महापालिकेच्या आणि खासगी रुग्णालयांचा समावेश आहे. परंतु लसीकरणासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी आणखी २४ खासगी रुग्णालयात लसीकरण सुरू करण्यास मान्यता देण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांची एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही.- कैलास जाधव, आयुक्त, महापालिकाएकीकडे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी पुरेशा प्रमाणात डोस उपलब्ध असल्याचे सांगतात आणि दुसरीकडे मात्र सातपूर परिसरात तिन्ही केंद्रांवर डोस नसल्याने ज्येष्ठ नागरिकांना पायपीट करत परत जावे लागले असे होऊ नये, यासाठी महापालिकेने पुरेसा साठा सर्वच केंद्रांवर करण्याचे नियोजन करावे.- प्रा. वर्षा भालेराव, नगरसेविका, भाजप

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल