शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात साडेतीन लाख नागरिकांना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:16 IST

बागलाण, दिंडोरी, इगतपुरी, कळवण, पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर या आदिवासीबहुल तालुक्यांमध्ये एक लाख ३४ हजार १०५ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. ...

बागलाण, दिंडोरी, इगतपुरी, कळवण, पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर या आदिवासीबहुल तालुक्यांमध्ये एक लाख ३४ हजार १०५ नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

आदिवासी तालुक्यांमध्ये नागरिक लस घेण्यासाठी अनुत्सुक असतील अशा तालुक्यांमध्ये जिल्हा परिषदेमार्फत जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यासंदर्भात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी नुकतीच सुरगाणा तालुक्यास भेट दिली. यावेळी लसीकरणाबाबत नागरिकांमध्ये असलेले गैरसमज जाणून घेत त्यांच्या शंकांचे निरसन करीत आदिवासी तालुक्यांमध्ये लसीकरणाबाबत समाजमाध्यमांद्वारे व्यापक प्रमाणात जनजागृती मोहीम राबविणार असल्याचे सांगितले.

-----

नाशिक जिल्ह्यातील आदिवासी तालुक्यांमध्ये नागरिक गैरसमजातून लस घेत नाहीत, असे प्रत्यक्ष भेटीत दिसून आले. दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील आदिवासी भागातदेखील कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे आदिवासी भागातील नागरिकांनी स्वत:ची काळजी घेत कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी, असे मी आवाहन करतो.

-बाळासाहेब क्षीरसागर, अध्यक्ष

----

_उपलब्धतेअभावी लसीकरण मोहिमेचा वेग जरी मंदावला असला तरी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत उपलब्धतेनुसार लस ही दिली जात आहे. आदिवासी भागात लस घेण्याबाबत अनेक गैरसमज आहेत, त्यासाठी जनजागृती मोहीम राबविण्यात येईल.

-लीना बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी