शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

नासाकावर अवसायक नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 00:10 IST

प्रशासकीय मंडळ बरखास्त : विक्रीचा मार्ग मोकळा नाशिक : राज्य सरकारने नाशिक सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी नियुक्त केलेले प्रशासकीय मंडळ बरखास्त करून नासाकावर दोन अवसायकांची नियुक्ती केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नाशिक : राज्य सरकारने नाशिक सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी नियुक्त केलेले प्रशासकीय मंडळ बरखास्त करून नासाकावर दोन अवसायकांची नियुक्ती केल्याची माहिती सूत्रांनी दिली. जिल्हा बॅँकेचे हेमंत गोसावी व विभागीय सहनिबंधक कार्यालयातील विभागीय उपसहनिबंधक दिगंबर हौसारे या दोघांची नासाकावर नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा बॅँकेला तसे पत्र प्राप्त झाले आहे.दरम्यान, पालकमंत्री गिरीश महाजन यांना सोमवारी (दि.१८) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या संचालक मंडळातील एका शिष्टमंडळाने याबाबतची माहिती दिली. तसेच कर्जमाफीचा निधी लवकरात लवकर जिल्हा बॅँकेकडे शासनाकडून वर्ग करण्याची विनंती केली. जिल्हा बॅँकेला नासाका सुरू करण्याबाबत ना हरकत दाखला देण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिल्याचे व त्यानंतर याप्रश्नी अवसायक नियुक्ती रद्द करण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.नाशिक दौºयावर असलेले पालकमंत्री गिरीश महाजन यांची जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्यासह सात ते आठ संचालक मंडळाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. कर्जमाफीचा निधी लवकरात लवकर जिल्हा बॅँकेकडे राज्य सरकारकडून वर्ग करण्याबाबत या शिष्टमंडळाने पालकमंत्री गिरीश महाजन यांना विनंती केली. तसेच नाशिक सहकार साखर कारखान्याला ना हरकत दाखला देता येणार नाही. कारण नासाकावर अहमदनगर साखर सहसंचालक कार्यालयाने अवसायक म्हणून जिल्हा बॅँकेचे अधिकारी हेमंत गोसावी व विभागीय उपसहनिबंधक दिगंबर हौसारे यांची नियुक्ती केल्याचे सांगितले. जिल्हा बॅँकेने सरफेसी कायद्यानुसार नासाकाच्या विक्रीसाठी निविदा प्रसिद्ध केली असून, येत्या २९ सप्टेंबरपर्यंत त्यासाठी मुदत देण्यात आली आहे. नासाका अवसायानात निघून त्यावर अवसायकाची नियुक्ती झाल्याने आणि प्रशासकीय मंडळ बरखास्त झाल्याने नासाकाचे बॉयलर पेटण्याची आशा दिवसेंदिवस धूसर होत चालली आहे.इन्फो..२९ रोजी बॅँकेची सभाजिल्हा बॅँकेची येत्या २९ सप्टेंबर रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा बोलविण्यात आली असून, ही सभा विविध विषयांनी वादळी ठरण्याची चिन्हे आहेत. गेल्या मार्चपासून जिल्हा बॅँकेचे धनादेश वटत नसल्याने तो चर्चेचा विषय आहे.अध्यक्ष पदाला बगलजिल्हा बॅँकेवर भाजपाचा संचालक अध्यक्ष करण्याच्या हालचाली भाजपाच्या गोटातून सुरू असताना पालकमंत्र्यांच्या भेटीत मात्र या विषयाला बगल देण्यात आल्याचे कळते. या विषयावर अवाक्षरदेखील चर्चा झाली नसल्याचे कळते. अध्यक्ष पदाला बगलजिल्हा बॅँकेवर भाजपाचा संचालक अध्यक्ष करण्याच्या हालचाली भाजपाच्या गोटातून सुरू असताना पालकमंत्र्यांच्या भेटीत मात्र या विषयाला बगल देण्यात आल्याचे कळते. या विषयावर अवाक्षरदेखील चर्चा झाली नसल्याचे कळते.