शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

सायखेडा येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 00:11 IST

सायखेडा : येथील सायखेडा-शिंगवे रस्त्यालगत देवी मंदिरापासून जवळच असलेल्या दशरथ गणपत कुटे यांच्या गट नं. ४०६ शेतात रात्री गाय व वासरी बांधलेली होती. रविवारी पहाटेच्या सुमारास बिबट्याने हल्ला करत तीन वर्षांची वासरी ठार केली. मांजरगाव येथे बिबट्याला पकडल्याची घटना तसेच शिंगवे येथील शेतमजुरावर हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच सायखेडा येथे ही घडल्याने ग्रामस्थांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

सायखेडा येथे वनविभागाने लावलेला पिंजरा. सोबत वनसेवक भैया शेख, उल्हास उगले व शेतकरी.

 

सायखेडा : येथील सायखेडा-शिंगवे रस्त्यालगत देवी मंदिरापासून जवळच असलेल्या दशरथ गणपत कुटे यांच्या गट नं. ४०६ शेतात रात्री गाय व वासरी बांधलेली होती. रविवारी पहाटेच्या सुमारास बिबट्याने हल्ला करत तीन वर्षांची वासरी ठार केली. मांजरगाव येथे बिबट्याला पकडल्याची घटना तसेच शिंगवे येथील शेतमजुरावर हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच सायखेडा येथे ही घडल्याने ग्रामस्थांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.गोदाकाठ परिसरात चाटोरी, बेरवाडी, सोनगाव, करंजगाव, मांजरगाव या सर्वच ठिकाणी बिबट्याने हल्ला चढविल्याच्या घटना घडल्या आहेत.बिबट्यांची संख्या इतकी वाढली कशी व पिंजऱ्यात पकडलेले बिबटे जातात कुठे, असा प्रश्न येथील ग्रामस्थ व शेतकरी करीत आहे. सदरील घटनांमुळे परिसरातील शेतकरी व शेतमजूर भयभीत झाले असून, शेतीची कामे विस्कळीत झाली आहेत. वनविभागाने आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून बिबट्यांची शोध मोहीम राबवून या दहशतीतून मुक्तता करण्याची मागणी होत आहे. वनविभागाने या घटनेनंतर संवेदनशील राहण्याची मागणी केली आहे. सदरील घटनेची माहिती मिळताच वनक्षेत्रपाल संजय भंडारी, वनरक्षक विजय टेकनर यांच्या मार्गदर्शनाखाली वनसेवक भैया शेख यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून गट नं. २७५ मधील क्षेत्रात पिंजरा लावला आहे.