शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

द्राक्षबागा वाचविण्यासाठी नैसर्गिक घटकांचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 01:03 IST

परतीच्या पावसाचा फटका बसलेल्या द्राक्षांचा दर्जा टिकविण्यासाठी उत्पादकांनी नामी शक्कल लढवित शेंगदाणा, गुळासह सोयाबीनसारख्या नैसर्गिक घटकांच्या वापराचा प्रयोग सुरू झाला आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची शक्कल : शेंगदाणा, गूळ, चणा डाळीच्या पिठासह सोयाबीनमुळे आकारमान वाढणार

वणी : परतीच्या पावसाचा फटका बसलेल्या द्राक्षांचा दर्जा टिकविण्यासाठी उत्पादकांनी नामी शक्कल लढवित शेंगदाणा, गुळासह सोयाबीनसारख्या नैसर्गिक घटकांच्या वापराचा प्रयोग सुरू झाला आहे.द्राक्षबागांवर द्राक्षांचे बहारदार द्राक्ष नजरेत भरू लागली असून, उत्तम, दर्जेदार व चविष्ट द्राक्षे नैसर्गिक पद्धतीने उत्पादित होऊन परिसराचा नावलौकिक कायम राहावा याकरिता उत्पादक प्रयत्नशील आहेत. काही कालावधी-पूर्वी अतिवृष्टी, प्रतिकूल वातावरणामुळे तालुक्यातील सुमारे पन्नास टक्के द्राक्षबागांना फटका बसला तर काही द्राक्षबागा भुईसपाट झाल्या. नुकसानीतून वाचलेल्या बागांना नवसंजीवनी देण्यासाठी महागड्या द्रवरूपी औषधांची फवारणी पावडर व इतर उपाययोजना उत्पादकांनी केल्या.द्राक्षबागांच्या मुळाशी एकरी एक क्विंटल शेंगदाणा ढेप, वीस किलो सोयाबीन पीठ, दहा किलो गूळ व आवश्यक असल्यास चणा डाळीचे पीठ असे सर्व घटक सहाशे लिटर पाण्यात एकत्रित करून द्रवस्वरूपात एकजीव झाल्यानंतर द्राक्षझाडांच्या मुळांना हे मिश्रण द्यावयाचे त्यासाठी विशिष्ट पद्धतीचा गाडा तयार करून त्याद्वारे ही प्रक्रिया पार पाडण्यात येते, अशी माहिती द्राक्ष उत्पादक जयवंत थोरात यांनी दिली. यामुळे द्राक्षाचे आकारमान वाढते, त्यातील गर वाढतो, साखरेची पातळी नैसर्गिक पद्धतीने वाढते व कडकपणा टिकून राहतो तसेच द्राक्षाचा रंग व चव यातही सकारात्मक बदल दिसून येतात, अशी माहिती प्रदीप जमधडे, अण्णा चव्हाणके यांनी दिली. सद्यस्थितीत सुमारे पन्नास टक्के द्राक्षबागा सुस्थितीत असून, उत्पादनात मोठी घट येणार आहे त्यामुळे दर्जेदार व चविष्ट द्राक्षांना चांगला दर मिळेल, असा उत्पादकांचा अंदाज आहे. त्यानुसार द्राक्षाचा दर्जा टिकविण्यासाठी नमूद प्रयोग बहुतांशी उत्पादक करीत आहेत. सध्या नैसर्गिक घटकांचा वापर करून शेती उत्पादनाकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिले तर भवितव्यासाठी ही बाब सकारात्मक असून, उत्पादकांनी हे आव्हान स्वीकारून बदल करण्याची मानसिकता ठेवावी, असे आवाहन उत्पादक महेंद्र बोरा, प्रकाश कड, विलास कड, नामदेव घडवजे, सुनील बर्डे, माणिक गोलांडे यांनी केले आहे.

टॅग्स :agricultureशेती