शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

गोदाघाटाचा वापर पर्यटनवृद्धीसाठी करा

By admin | Updated: October 21, 2015 22:03 IST

छगन भुजबळ : महापालिकेला केली सूचना

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त कोट्यवधी रुपये खर्चून गोदावरी नदीवर बांधण्यात आलेले घाट आणि साधुग्रामच्या जागेचा वापर पर्यटन वृद्धीसाठी करण्याची सूचना माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांसह महापौर आणि आयुक्तांना केली आहे. भुजबळ यांनी प्रसिद्धिपत्रात म्हटले आहे, सिंहस्थ आराखड्यानुसार गोदावरी नदीवर सात घाटांची नव्याने निर्मिती करण्यात आली. सदर घाट हे महापालिकेने जलसंपदा विभागाच्या ताब्यातून घेऊन त्यांचे कायमस्वरूपी संरक्षण व देखभाल करावी. याशिवाय कन्नमवार ते लक्ष्मीनारायण पुलादरम्यानच्या घाटाजवळ असलेले मैदान विविध प्रदर्शने, सभा-समारंभासाठी वापरता येऊ शकेल. या जागेचा उपयोग पर्यटनासाठी केल्यास महापालिकेला त्यातून शाश्वत स्वरूपात उत्पन्नही प्राप्त होऊ शकेल. मैदानात पीपीपी तत्त्वावर अथवा मनपा निधीतून एका बाजूला स्वच्छतागृह तर एका बाजूला फूड स्टॉल उभारण्यात यावेत. मुलांसाठी खेळणी बसविण्यात यावीत. परिसराचे फुलझाडांनी सुशोभिकरण करावे, अशी सूचना भुजबळ यांनी केली आहे. (प्रतिनिधी)