शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलकांना हटविण्यासाठी बळाचा वापर

By admin | Updated: January 28, 2017 01:04 IST

त्र्यंबकेश्वर माजी सैनिक घर प्रकरण : २१ आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल

नाशिक : १९९५ पूर्वीच्या झोपड्या तत्काळ नियमित कराव्यात, त्र्यंबकेश्वरमधील १३० झोपड्यांची जागा रहिवाशांच्या नावे करावी, माजी सैनिक मेजर रामराव लोंढे यांच्या पाडलेल्या घराची नुकसानभरपाई द्यावी, आरक्षित भूखंडांवरील नगरसेवकांची अतिक्रमणे हटवून त्यांचे नगरसेवक पद रद्द करून दोषी अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी यांसह विविध मागण्यांसाठी प्रजासत्ताक दिनी श्रमजीवी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला़ जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून आंदोलन करणाऱ्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी बळाचा वापर करीत ताब्यात घेतले़ यामध्ये एक महिला पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाली़श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली त्र्यंबकेश्वरमधील शेकडो आदिवासी, बिगर आदिवासी समाजातील लोकांनी आपल्या न्याय्य व हक्काच्या मागण्यांसाठी प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला होता़ संघटनेने पालकमंत्री गिरीश महाजन व जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना दिलेल्या निवेदनानुसार त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या हद्दीत भारतीय सैन्य दलातील माजी सैनिक रामराव लोंढे यांनी शासनाकडून जागा विकत घेऊन १९९१ पूर्वी रितसर परवानगी घेऊन घर बांधले़; मात्र हे घर नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व उपविभागीय अधिकाऱ्यांनी अतिक्रमित दाखवून पाडले़ या प्रकरणाची चौकशी करून या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी़राज्यभरातील माजी सैनिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा अधिकाऱ्यांनी दर तीन महिन्यांनी बैठक घ्यावी, माजी सैनिकांच्या घरपट्ट्या माफ करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, त्र्यंबकेश्वरमधील अतिक्रमणाला संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कायदेशीर कारवाई करावी या मागण्या संघटनेने केल्या आहेत. या मागण्यांबाबत कार्यवाही न झाल्यास संघटनेतर्फे जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडित, उपाध्यक्ष रामभाऊ वारणा, केशव नानकर, बाळाराम भोईर, विजय जाधव यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)