शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे फसला फूटमॅटचा प्रयोग

By admin | Updated: September 19, 2015 22:29 IST

तंत्रज्ञान : गेल्या पर्वण्यांत मोजले होते भाविक; अखेरच्या पर्वणीत तांत्रिक अडचण

नाशिक : कुंभमेळ्यातील पर्वणीला स्नानाच्या विविध ठिकाणी अत्याधुनिक फूटमॅट बसवून त्याद्वारे भाविकांची संख्या मोजण्याचा प्रयोग शुक्रवारी पावसामुळे फसला. गेल्या पर्वणीला या प्रयोगाद्वारे सुमारे तीन लाख भाविकांची शास्त्रशुद्ध मोजणी करण्यात आली होती. कुंभमेळ्याच्या पर्वणीला विशिष्ट ठिकाणी, विशिष्ट वेळेत किती भाविकांची गर्दी झाली, याचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने हा प्रयोग पहिल्या दोन्ही पर्वण्यांना राबवण्यात आला. पैकी पहिल्या पर्वणीला ७५ हजार भाविकांची मोजणी करण्यात आली, तर दुसऱ्या पर्वणीत हा प्रयोग आणखी व्यापक करण्यात आला व शहरातील पाच घाटांवर भाविकांच्या बाहेर पडण्याच्या ठिकाणी (एक्झिट पॉइंट्स) फूटमॅट बसवण्यात आले. त्यात लक्ष्मीनारायण घाटावर दोन, तर रोकडोबा पटांगण, अमरधाम, घारपुरे घाट येथील प्रत्येकी एका फूटमॅटचा समावेश होता. ‘फूटमॅट’ हे तंत्रज्ञान मॉल्समध्ये वापरले जाते; मात्र तेथे एका रांगेत जाणाऱ्या लोकांचीच मोजणी होते. कुंभमेळ्यात मात्र असे शक्य नसल्याने विराज रानडे, परीक्षित जाधव, नीलय कुलकर्णी व हिरेन पंजवाणी चौघा तरुणांनी वेगळे तंत्रज्ञान विकसित करीत रस्त्याच्या आकाराचे- साधारणत: ८ मीटर बाय दीड फूट या आकाराचे ‘फूटमॅट’ तयार केले. या प्रकल्पाला ‘कुंभथॉन’नेही सहकार्य केले. काळ्या रबराच्या फूटमॅटमध्ये विशिष्ट सेन्सर्स बसवण्यात आले. त्यावरून भाविक चालत गेल्यास त्यांचे आपोआप मोजमाप होऊन त्यांची संख्या संबंधित संकेतस्थळावर झळकते. तसेच अ‍ॅपवरही उपलब्ध होते. त्यानुसार दि. १३ रोजी सायंकाळपर्यंत सदर पाच ठिकाणे मिळून तीन लाख भाविकांची मोजणी झाली होती. हाच प्रयोग तिसऱ्या पर्वणीतही अवलंबला जाणार होता; मात्र पहाटेपासूनच सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे ते शक्य होऊ शकले नाही. एक-दोन ठिकाणी फूटमॅट बसवण्यात आले; मात्र त्यावरून पाणी वाहत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून ते काढून घेण्यात आले. (प्रतिनिधी)