शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
5
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
6
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
7
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
8
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
9
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
10
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
11
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
12
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
13
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
14
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
15
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
16
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
17
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
18
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
19
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
20
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...

कूपनलिका पुनर्भरणाचा प्रयोग

By admin | Updated: October 16, 2016 01:05 IST

माळेगाव : नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा उपक्रम

सिन्नर : येथील माळेगाव औद्योगिक वसाहतीतील श्रीप्रसाद या कारखान्यात डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने कूपनलिका पुनर्भरण व सॅण्ड फिल्टर प्रात्यक्षिकांचा प्रयोग यशस्वीपणे राबविण्यात आला. कारखान्याच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी एकत्रित करून सॅण्ड फिल्टरच्या सहायाने कारखान्याच्या आवारातील कूपनलिकेत सोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या प्रयोगामुळे जमिनीची भूजल पातळी वाढविणे, पाण्यातील क्षारांचे प्रमाण कमी करणे, टंचाई काळात पाण्याची गरज भागविणे यासाठी सदर प्रयोगाचा लाभ होत आहे. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा कूपनलिका पुनर्भरण व सॅण्ड फिल्टर अत्यंत उपयुक्त उपक्रम असून, माळेगाव परिसरातील सर्वच कूपनलिका पुनर्भरणासाठी ग्रामपंचायतीमार्फत हा प्रयोग राबविण्याचा प्रयत्न आम्ही करणार असल्याचे माळेगावचे सरपंच अनिल आव्हाड यावेळी म्हणाले. याप्रसंगी योगेंद्रसिंग पाटील, गोरख जाधव, श्रीकांत शेळके, राकेश बावीस्कर, बाबासाहेब हाडोळे, माजी सरपंच तुकाराम सांगळे, सूर्यभान सांगळे, आमोलिक जाधव, अशोक जाधव, खंडू जाधव, ग्रामविकास अधिकारी कैलास वाक्चौरे, उद्योजक शंकर खोकले, दीपक जाधव आदि उपस्थित होते. प्रात्यक्षिकासाठी प्रतिष्ठानचे उदय कुदळे, योगेश क्षत्रिय, महेंद्र कानडी, शिवाजी चव्हाण, गोविंद कोळी, संजय शेलार, विक्रम गोसावी, सोपान कोल्हे, परसराम कोल्हे, राजेंद्र परदेशी, श्रीकांत शेळके, विश्राम पाटील, शिवाजी लकडे, मनीष म्हात्रे, किशोर म्हात्रे, अंबादास काकुळते, प्रदीप जाधव, प्रकाश जाधव, मयूर जाधव, सागर कोथमिरे यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)