नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आलेल्या साधू-महंतांना देण्यात आलेल्या गॅस सिलिंडरच्या अनुदानाची रक्कम येत्या दोन दिवसांत जमा करण्यात येणार असून, गेल्या दोन महिन्यांत जवळपास १७ हजारांहून अधिक गॅस सिलिंडरचा वापर करण्यात आला आहे. सोमवारी यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. त्यात गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत किती खालसे, आखाड्यांनी इंधनासाठी गॅसची जोडणी घेतली व किती सिलिंडरचा वापर करण्यात आला. तसेच किती साधूंनी अनुदान जमा करण्यासाठी बॅँक खात्याची माहिती सादर केली याची माहिती जाणूून घेण्यात आली. कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या साधूंना अनुदानित गॅस सिलिंडर देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता, त्यासाठी खालसे, आखाड्यांनी गॅससाठी अनामत रक्कम भरून जोडणी घेण्याचे आवाहन करण्यात आले होते.
१७ हजार सिलिंडरचा वापर
By admin | Updated: September 22, 2015 23:28 IST