सुरगाणा : जम्मू काश्मिर मधील उरी येथे दहशतवादींनी केलेल्या हल्ल्यात जवान शहीद झाल्याच्या निषेधार्थ शहरवासीयांनी एकजूट करून सुरगाणा शहर बंद ठेवून पाकिस्तान विरोधात घोषणा देऊन प्रधानमंत्री नवाज शरीफ यांचा पुतळा जाळून पाकिस्तानला कायमची अद्दल घडवा अशी केंद्र सरकारकडे मागणी केली.याप्रसंगी विजय कानडे, अबू नाईकडा, अकिल पठाण, रतन चौधरी, नासिर मणियार आदिंनी पाकिस्तान विरोधातील आपल्या तीव्र भावना मनोगतातून व्यक्त केल्या. याप्रसंगी नगराध्यक्ष रंजना लहरे, उपनगराध्यक्ष सचिन अहेर, नगरसेवक सुरेश गवळी, डॉ.विनोद महाले, दीपक थोरात, ज्ञानेश्वर कराटे, दिनकर पिंगळे, भास्कर पवार, सचिन महाले, राजू माळी, मुन्ना कानडे, डॉ. नितीन अहेर, जितेंद्र वाघ, भास्कर गाढवे, जयवंत जंगम, अमोल बिरारी, दीपक चव्हाण आदिंसह जि. प. शाळेचे विद्यार्थी तसेच शहरवासीय उपस्थित होते. यावेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.आजच्या बंद मागचा हेतू एवढाच आहे की, उरी येथील हल्ल्यात शहीद झालेल्या जवान व त्यांच्या कुटुंबाप्रती एका कोपऱ्यात असलेल्या दुर्गम भागातही नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या तीव्र वेदना केंद्र सरकारपर्यंत पोहोचल्या पाहिजे, असे संतप्त मनोगत नगरसेवक अकिल पठाण यांनी व्यक्त केले. शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांसाठी मदत निधी गोळा करून शासनाकडे सोपविण्यात येणार असल्याचे भाजयुवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विजय कानडे यांनी सांगितले. (वार्ताहर)
उरी हल्ल्याचा निषेध
By admin | Updated: September 22, 2016 23:26 IST