शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
3
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
4
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
5
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
6
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
7
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
8
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
9
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
10
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
11
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
12
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
13
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
14
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
15
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
16
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
17
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
18
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
19
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!

‘गंगापूर’मधूनच वाढीव पाणी आरक्षणाचा आग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 00:37 IST

यंदा वरुणराजाच्या कृपावृष्टीमुळे शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणात ९८ टक्के पाणीसाठा असल्याने महापालिकेने सन २०१७-१८ या वर्षासाठी गंगापूर धरणातून ४३०० दलघफू पाणी आरक्षणाची मागणी जलसंपदा खात्याकडे नोंदविलेली आहे.

नाशिक : यंदा वरुणराजाच्या कृपावृष्टीमुळे शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणात ९८ टक्के पाणीसाठा असल्याने महापालिकेने सन २०१७-१८ या वर्षासाठी गंगापूर धरणातून ४३०० दलघफू पाणी आरक्षणाची मागणी जलसंपदा खात्याकडे नोंदविलेली आहे. दारणा धरणातील ४०० दलघफू पाणी आरक्षणापैकी सन २०१६-१७ मध्ये महापालिकेने केवळ ३०२ दलघफू पाणी उचलल्याने यंदा ३०० दलघफू पाणी आरक्षणाचीच मागणी करण्यात आलेली आहे. गुरुवारी (दि.२) जिल्हाधिकाºयांकडे होणाºया पाणी आरक्षणाच्या संदर्भात आयोजित आढावा बैठकीत दारणातील पाणी आरक्षण कमी करून ते गंगापूर धरणातून वाढवून देण्याचा आग्रह महापालिकेकडून धरला जाणार आहे.  महापालिकेने गेल्या वर्षी दि. १५ आॅक्टोबर २०१६ ते ३१ जुलै २०१७ या कालावधीसाठी गंगापूरमधून ४२०० दलघफू तर दारणातून ३०० दलघफू पाणी आरक्षणाची मागणी केली होती परंतु, जलसंपदा खात्याने गंगापूरमधून ३९०० तर दारणातून ४०० दलघफू पाणी आरक्षणाला मान्यता दिली होती. महापालिकेने २९० दिवसांत पाणीपुरवठ्याचे काटेकोर नियोजन करत प्रतिदिन १४.७३ दलघफू पाणी उचल लक्षात घेता ३१ जुलैपर्यंत गंगापूर धरणातील पाण्याचा पूर्णपणे वापर केला होता. तर दारणा धरणातून ४०० पैकी ३०२ दलघफू इतकीच पाण्याची उचल करण्यात आली होती. गंगापूर धरण समूहात ९९ टक्के साठा शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणात ३० आॅक्टोबर २०१७ अखेर ५५०० दलघफू म्हणजे ९८ टक्के पाणीसाठा झालेला आहे. गंगापूर धरण समूहातील कश्यपी धरणात १८४१ दलघफू (९९ टक्के), गौतमी गोदावरी १८५६ दलघफू (९९ टक्के) तर आळंदी धरणात ९७० दलघफू (१०० टक्के) पाणीसाठा आहे. गंगापूर धरण समूहात एकूण १०१६७ दलघफू (९९ टक्के) पाणीसाठा आहे तर दारणा धरणात ७१४९ दलघफू म्हणजे शंभर टक्के पाणीसाठा आहे. दारणा धरणातील पाणी उचलण्यास येणाºया मर्यादा लक्षात घेता दारणातील वाढीव पाणी आरक्षणाचा महापालिकेला काहीच फायदा होत नाही. त्यामुळे गंगापूरमधूनच पाणी आरक्षण वाढविण्याचा आग्रह महापालिकेकडून धरला जाणार आहे.दारणातील आरक्षण कमी करण्याची मागणी महापालिका दारणा धरणातून नाशिकरोड भागासाठी पाण्याची उचल करत असते परंतु, दरवर्षीचा अनुभव लक्षात घेता दारणा धरणातून ३०० दलघफूच्या वर पाण्याची उचल करता येत नाही. तांत्रिकदृष्ट्या पाणी उचल करण्यात अडचणी येत असल्याने दारणातील पाणी आरक्षण कमी करण्याची मागणी महापालिकेने यापूर्वी वारंवार जलसंपदा विभागाकडे केलेली आहे. सन २०१५ पर्यंत महापालिकेला दारणा धरणातून ५०० दलघफू पाणी आरक्षण मिळत आले आहे. परंतु, सन २०१५-१६ मध्ये पाणीप्रश्न पेटल्यानंतर जलसंपदा विभागाने दारणातील पाणी आरक्षण १०० दलघफूने घटवत ४०० दलघफूवर आणले होते.  मात्र, गेल्या वर्षभरात ३०२ दलघफू पाण्याचीच उचल करणे महापालिकेला शक्य झाले. दारणातील पाणी उचलण्याची क्षमता लक्षात घेऊन महापालिकेने आता सन २०१७-१८ या वर्षासाठी दारणातून ३०० दलघफू पाणी आरक्षणाची मागणी केली आहे.  गंगापूर धरणातून ४३०० दलघफू पाण्याची मागणी नोंदविण्यात आलेली आहे. यंदा गंगापूर धरणासह समूहात मुबलक पाणीसाठा असल्याने जलसंपदा विभागाकडून महापालिकेची मागणी मान्य केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.