शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसाधारण सभा लवकर घेण्यासाठी आग्रह

By admin | Updated: August 8, 2014 01:06 IST

सर्वसाधारण सभा लवकर घेण्यासाठी आग्रह

 

नाशिक : येत्या १५ आॅगस्टनंतर कधीही आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याच्या चर्चेने सर्वसाधारण सभा ही १० किंवा ११ आॅगस्टलाच घेण्यात यावी, या मागणीचे पदाधिकारी व सदस्य असलेल्या २३ जणांचे स्वाक्षरीचे पत्र गुरुवारी सामान्य प्रशासन विभागाला देण्यात आले. त्यामुळे अध्यक्षांनी २० आॅगस्टची तारीख दिल्याने सभा नेमकी कधी घ्यावी, या विवंचनेत प्रशासन सापडले आहे.उपाध्यक्ष संपतराव सकाळे यांच्यासह सभापती राजेश नवाळे, सुनीता अहेर व अन्य भाजपा, सेना, माकप अशा सर्वपक्षीय २० अशा एकूण २३ जणांनी सर्वसाधारण सभा लवकर घेण्याची मागणी करण्याचे लेखी पत्रच प्रशासनाला दिले आहे. विशेष म्हणजे, जिल्हा परिषद अधिनियमात एकूण सदस्यांपैकी एक पंचमांश सदस्यांनी मागणी केल्यास सर्वसाधारण सभा घेण्याबाबतचा प्रस्ताव तयार करून तो अध्यक्षांकडे पाठविण्याची तरतूद आहे. त्याच नियमाचा आधार घेऊन सर्वसाधारण सभा घेण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेत स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. आता अध्यक्षांनाही नियमानुसार सभेबाबतचा निर्णय घ्यावा लागणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.त्यातही जिल्हा परिषदेत आजवर सर्वपक्षीय सदस्य एकवटले जात नसल्याचे चित्र असतानाच निधी खर्च होणार नाही, आचारसंहिता लागण्याची शक्यता गृहीत धरून सर्वसाधारण सभा लवकरात लवकर घेण्याच्या मागणीसाठी प्रथमच ही स्वाक्षरी मोहीम या अडीच वर्षांच्या कार्यकाळात राबविण्यात आल्याने त्याबाबत चर्चा सुरू आहे. आता प्रशासन नेमकी काय भूमिका घेते, याकडे या २३ सदस्यांचे लक्ष लागून आहे. (प्रतिनिधी)