शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

अवनखेडला कादवा नदीत युवक बेपत्ता 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 23:55 IST

दिंडोरी : तालुक्यातील अवनखेड येथील कादवा नदीत पोहण्यास गेलेल्या खाजगी कंपनीतील कामगार बुडाल्याची भीती व्यक्त होत आहे. त्याचा शोध घेण्यासाठी अग्निशामक दलाने रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबविली. मात्र तपास लागू शकला नसल्याने गुरुवारी पुन्हा शोध कार्य राबविले जाणार आहे.

ठळक मुद्देशोध घेण्यासाठी अग्निशामक दलाने रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम

दिंडोरी : तालुक्यातील अवनखेड येथील कादवा नदीत पोहण्यास गेलेल्या खाजगी कंपनीतील कामगार बुडाल्याची भीती व्यक्त होत आहे. त्याचा शोध घेण्यासाठी अग्निशामक दलाने रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबविली. मात्र तपास लागू शकला नसल्याने गुरुवारी पुन्हा शोध कार्य राबविले जाणार आहे.अवनखेड येथील विकास सीताराम निकम (३०) तसेच त्याचा भाऊ व भाचा हे तिघे कादवा नदीवर पोहण्यासाठी गेले होते. विकास नदीत पोहत असताना त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. ही बाब त्याचा भाऊ बाळा निकम याने बघितल्यावर त्याने आरडाओरड करत विकासला वाचविण्यासाठी नदीच्या पुलावरून पाण्यात उडी मारली. मात्र तोपर्यंत विकास बेपत्ता झाला होता.घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक उमेश बोरसे, सहाय्यक प्रवीण पाडवी आदींनी घटनास्थळी धाव घेत शोध कार्य सुरू केले. अग्निशामक दलाचे जवान पी. आर. पगारे, प्रदीप बोरसे, आर. आर. खरे आदी रात्री उशिरापर्यंत शोध घेत होते. तहसीलदार बाबासाहेब गाढवे, सरपंच नरेंद्र जाधव, उपसभापती उत्तम जाधव, माजी सभापती भास्कर भगरे, रामदास पाटील, पिंपळगाव केतकीचे उपसरपंच विनोद देशमुख आदी घटनास्थळी उपस्थित होते. विकास याचा अवघ्या दहा महिन्यापूर्वी विवाह झाला होता.