शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

शनैश्चर जयंतीचा अपूर्व उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2016 00:50 IST

भक्तिमय वातावरण : शनी मंदिरांमध्ये भाविकांची रीघ

नाशिक : नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजम। छायामार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम् ।। या शनी मंत्राच्या गजराने शहरात शनिवारी (दि.४) भक्तिमय वातावरण बघायला मिळाले. शनैश्चर जयंती तसेच शनि अमावस्येनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन ठिकठिकाणी करण्यात आले होते. शनि अमावस्येला विशेष महत्त्व असल्याने शहरातील विविध शनी मंदिरांमध्ये भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.रविवार पेठ, पंचवटीतील शनी चौक, भद्रकालीतील शनी मंदिर, मुंबई नाका येथील मंदिरांमध्ये भाविकांनी मनोभावे पूजा केली. शनिवारी सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांसह नवचंडिका यज्ञ, होमहवन यांसह पालखी सोहळ्याचे आयोजन शहरात करण्यात आले होते. रविवार पेठेतील शनैश्चर मंदिरातर्फे भव्य पालखी काढण्यात आली. रविवार पेठेतील शनी मंदिर, चांदीचा गणपती, टिळकपथ सिग्नल, मेहेर सिग्नल आणि अशोकस्तंभ मार्गाने काढण्यात आलेल्या पालखी सोहळ्यात अनेक भाविक सहभागी झाले होते. शनैश्चर महाराजांचा चांदीचा मुखवटा असलेली पालखी आकर्षक पुष्पमालांनी सजविण्यात आली होती.शनिवारी सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी अमावस्येला सुरुवात होऊन रविवारी दुपारी १२ वाजून ३६ मिनिटांपर्यंत अमावस्या समाप्त होणार आहे. यावर्षी शनैश्चर जयंती शनिवारी आल्याने शनिभक्तांमध्ये या दिवसानिमित्त अपूर्व उत्साह पहायला मिळाला. या दिवशी केलेली शनीची आराधना लाभदायक ठरत असल्याची भावना भक्तांनी व्यक्त केली. शनिवारी संध्याकाळी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी मंदिरांमध्ये दिसून आली. यावेळी भाविकांनी मनोभावे पूजा करून देवाला तेलाचा अभिषेक, रुईच्या पानांची आणि फुलांची माळ भक्तिभावाने अर्पण केली. (प्रतिनिधी)