शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ८६ गावांना अवकाळीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:16 IST

नाशिक : जिल्ह्याला पुन्हा एकदा अवकाळी आणि गारपिटीचा फटका बसला असून जिल्ह्यातील ८६ गावांमधील शेतीक्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान ...

नाशिक : जिल्ह्याला पुन्हा एकदा अवकाळी आणि गारपिटीचा फटका बसला असून जिल्ह्यातील ८६ गावांमधील शेतीक्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने केलेल्या प्राथमिक पंचनाम्यानुसार ५ हजार ७०२ हेक्टरवरील पिके आडवी झाली आहेत. सर्वाधिक नुकसान निफाड, दिंडोरी, सटाणा व मालेगाव तालुक्यांमध्ये झाले आहे.

जिल्ह्यात गेल्या पाच महिन्यांत तीनदा शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागला. गेल्या आठवड्यापासून ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष पिकांचा धोका वाढलेला असताना गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे नुकसानीत अधिकच भर पडली. नुकत्याच झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील ८६ गावांतील ५ हजार ७०२ हेक्टरवरील पिके व फळबागांचे नुकसान झाले. पशुधनाचेदेखील मोठे नुकसान झाले असून जिल्हा प्रशासनाने युद्धपातळीवर प्राथमिक पंचनामे पूर्ण करण्यात आले. या नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

बदलत्या ऋतुचक्रानुसार कोसळणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. या पावसाचा फटका जिल्ह्यातील ८६ गावांमधील शेतकऱ्यांना बसला आहे. अवकाळीमुळे गहू, मका, बाजरी, ज्वारी, हरभर‍ा व भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. वार्षिक व बहुवार्षिक फळपिकांनाही तडाखा बसला आहे. पपई, आंबा, डाळिंब व द्राक्षबागांचे नुकसान झाल्याचे अहवालावरून समोर आले आहे. सर्वाधिक नुकसान झालेल्या तालुक्यांमध्ये निफाड, दिंडोरी, सटाणा व मालेगावचा समावेश आहे.

--इन्फो--

वीज पडून जीवितहानी

जिल्ह्यात निफाड तालुक्यात वीज पडून एकाचा मृत्यू झाला. पशुधनाचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मालेगावमध्ये बैल, सिन्नरमध्ये गाय तर देवळ्यात शेळी मृत्युमुखी पडली. अनेक ठिकाणी गोठ्यांचे पत्रे उडाल्याने मोठे नुकसान झाले आहे, तर घरपडझडीच्याही घटना घडल्या आहेत.