शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
3
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
4
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
5
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
6
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
7
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
8
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
9
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
10
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
11
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
12
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
13
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
14
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
15
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
16
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
17
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
18
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
19
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
20
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

असुरक्षित शालेय विद्यार्थी वाहतूक

By admin | Updated: June 26, 2016 00:32 IST

परवान्याकडे दुर्लक्ष : जिवाला घोर, क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी वाहनात; सुरक्षा धोक्यात

नाशिक : शालेय वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करत कायदा धाब्यावर बसवून शहरात विनापरवाना अवैध शालेय वाहतुकीचा धंदा ‘सर्रास’ सुरू आहे. अवैध वाहतुकीमुळे विद्यार्थ्यांसह पालकांच्याही जिवाला घोर लागत आहे; मात्र याचे संबंधित प्रशासकीय यंत्रणेला कुठलेही गांभीर्य नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.शाळा व्यवस्थापन, प्रादेशिक परिवहन कार्यालय व शहर वाहतूक पोलिसांकडून अवैध प्रवासी वाहतुकीकडे काणाडोळा केला जात असल्याने खासगी प्रवासी वाहतूकदारांचे फावले आहे. वाहनाच्या क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी बसवून बहुतांश ओम्नीचालक, रिक्षाचालक शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करत असल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे. असुरक्षित शालेय वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागण्याऐवजी वाढत असल्याने शहरात शालेय विद्यार्थ्यांचा सुरक्षित प्रवासाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. बहुतांश वाहनचालक ांकडे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा शालेय प्रवासी वाहतूक करण्याचा परवानाच नसल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच ज्यांच्याकडे परवाना आहे त्यांनी परवाने नूतनीकरणही केलेले नाही. विनापरवाना शालेय वाहतूक प्रशासकीय यंत्रणेच्या नाकावर टिच्चून केली जात आहे. शालेय वाहतुकीसंदर्भात राज्य शासनाने २०११ साली अध्यादेश जाहीर केलेला आहे; मात्र याच्या अंमलबजावणीसाठी प्रशासकीय यंत्रणेकडून कुठलीही उपाययोजना केली जात नाही.