नांदूर शिंगोटे : सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरातील कासारवाडी कृषी साधन सहकारी संस्थेची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. कासारवाडी येथील शेतकरी कृषी साधन या संस्था अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. या संस्थेचे संचालक मंडळ निवडण्यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. संचालक मंडळाच्या ११ जागांसाठी ११ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे सर्व ११ उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी संजय गायकवाड यांनी केली. बिनविरोध निवड झालेले संचालक पुढीप्रमाणे- सर्वसाधारण गटातून पोपट दामोधर शेळके, उल्हास निवृत्ती शेळके, बबन निवृत्ती दराडे, जगन्नाथ कोंडाजी खैरनार, रमेश दशरथ शेळके, महिला राखीव दोन जागांसाठी अलका गोरख शेळके व भीमाबाई सुभाष दराडे, इतर मागास प्रवर्ग गटासाठी फकिरा सखाराम सहाणे, भटक्या विमुक्त जाती-जमाती गटातून उल्हास पोपटराव शेळके, अनुसूचित जाती-जमाती गटातून बन्सी अनाजी जगताप यांचा समावेश आहे. (वार्ताहर)
कृषी साधन संचालक मंडळ बिनविरोध
By admin | Updated: February 28, 2017 00:54 IST