शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
4
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
5
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
6
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
7
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
8
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
9
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
10
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
11
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
12
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
13
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
14
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
15
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
16
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
17
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
18
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
19
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
20
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!

आगोदर विनामास्क फोटो; नंतर दंड वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:17 IST

नाशिक: कोरेानाला प्रतिबंध करण्यासाठी मास्क वापरणे गरजेचे असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात येणारे अधिकारी, कर्मचारी तसेच अभ्यागतांना मास्क वापरणे सक्तीचे ...

नाशिक: कोरेानाला प्रतिबंध करण्यासाठी मास्क वापरणे गरजेचे असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात येणारे अधिकारी, कर्मचारी तसेच अभ्यागतांना मास्क वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे. विनामास्क आढळणाऱ्यांवर हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी खातेप्रमुखांना दिले आहेत. विशेष म्हणजे, संबंधितांचा अगोदर फोटो काढून नंतर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

नाशिक शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्याबाबतची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी शासकीय कार्यालयांत मास्क बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला असून जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश काढले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच कार्यालय आवारात मास्कचा वापर न करणाऱ्या व्यक्तींकडून हजार रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे. केवळ मास्क जवळ आहे. परंतु, त्याचा वापर केला जात नसेल म्हणजेच मास्क तोंडाला लावलेला नसेल तरीही विनामास्क समजूनच दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

कारवाईसाठी नियुक्त केलेले कर्मचारी विनामास्क असलेल्यांचा अगोदर मोबाईलमध्ये फोटो काढून नंतर दंडात्मक कारवाई करणार आहेत. दंडाची पावतीदेखील संबंधितांना दिली जाणार आहे. वसूल झालेली रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा केली जाणार आहे. या सर्व परिस्थितीवर निवासी उपजिल्हाधिकारी हे लक्ष ठेवणार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय आवारात विनामास्क विरूद्धची मोहीम राबविली जाणार आहे.

जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती पाहता वेळीच पायबंद घालण्याच्या दृष्टीने शहरात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर जिल्ह्यात विनामास्क असणाऱ्यांना हजार रुपये दंड आकारला जात आहे. महापालिका आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात विनामास्कविरूद्धची मोहीम सुरू करण्यात आली आहे. शासकीय कार्यालय आवारात संबंधित विभागप्रमुखांकडूनही दक्षता घेतली जात आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाबरोबरच सर्व आस्थापना,सार्वजनिक ठिकाणे,सर्व समारंभ, कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित नागरिक यांना मास्क सक्तीचा करण्यात आल्याचे स्वतंत्र आदेशदेखील जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. आदेशाचा भंग करणारी व्यक्ती, संस्था आणि संघटना यांच्याविरूद्ध आपत्ती व्यवस्थापन साथरोग कायद्यानुसार योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.