शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमधील प्लॅस्टिक विक्रेत्यांचा बेमुदत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 00:54 IST

राज्य सरकारच्या पर्यावरण खात्याने तडकाफडकी प्लॅस्टिक बंदीचा निर्णय घेतल्याने नागरिकांची अडचण होणार असून, विक्रेत्यांवर कारवाईची टांगती तलवार ठेवल्याने अखेरीस या विक्रेत्यांनी नाशिक शहरात बेमुदत बंद पुकारला आहे.

नाशिक : राज्य सरकारच्या पर्यावरण खात्याने तडकाफडकी प्लॅस्टिक बंदीचा निर्णय घेतल्याने नागरिकांची अडचण होणार असून, विक्रेत्यांवर कारवाईची टांगती तलवार ठेवल्याने अखेरीस या विक्रेत्यांनी नाशिक शहरात बेमुदत बंद पुकारला आहे. प्लॅस्टिक विक्रेत्यांचे म्हणणे ऐकून घेण्याचे न्यायालयात आश्वासन देऊनही ते न ऐकता घेतलेल्या निर्णयामुळे आंदोलन सुरू करण्यात आले आहेत. राज्यातील विविध संघटनांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्याने त्याकडेही आता नाशिकमधील विक्रेत्यांचे लक्ष लागून आहे. पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्लॅस्टिक उत्पादन आणि विक्रीला बंदी घातली आहेत. नाशिक शहरात असलेल्या दुकानदारांपैकी प्लॅस्टिकच्या पिशव्या, थर्माकोलच्या प्लेट््स, ग्लास विक्रेत्यांची मोठी संख्या आहे. तसेच प्लॅस्टिक उत्पादन करणारे उद्योगही आहेत.राज्य सरकारने अचानक घेतलेल्या निर्णयाची तीव्र प्रतिक्रिया उमटली असून, शनिवारी (दि. २४) यासंदर्भात बैठक घेण्यात आली. यावेळी राज्य सरकारच्या निर्णयाच्या विरोधातील लढ्याविषयी चर्चा करण्यात आली. पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली प्लॅस्टिक बंदी घालण्यात आली असली तरी बाजारात त्याला पर्याय उपलब्ध करून देण्यात आला नसून अशावेळी ग्राहकांनी मागितलेल्या वस्तू कशात बांधून द्यायच्या यांसह विविध प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या आहेत असे सांगण्यात आले. या बैठकीस चिराग शहा, हसमुख पारख, बाफना, प्रफुल्ल संचेती, अरविंद दशपुते यांच्यासह अनेक व्यापारी हजर होते. शासनाच्या निर्णयानुसार पाण्याच्या बाटलीसाठी एक रुपया त्याच विक्रेत्याला डिपॉझिट म्हणून द्यायचा आणि त्यानंतर हा एक रुपया परत घेण्यासाठी बाटली परत आणून द्यायची, असा हास्यास्पद प्रकार कायद्यात नमूद केला आहे. एक रुपयासाठी नागरिक परत जाणार नाहीच शिवाय विक्रेत्याला बॉटल्स जमा करण्याचे नवे काम करावे लागणार आहे.न्यायालयाची दिशाभूलसरकारने प्लॅस्टिक बंदीचा मसुदा जाहीर केल्यानंतर व्यापारी आणि उद्योजकांनी त्यास विरोध करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार ६ मार्च रोजी सुनावणीच्या वेळी राज्य सरकारने प्लॅस्टिक विक्रेते आणि उद्योजक यांच्या सूचना आणि हरकती मागविण्यात येईल आणि त्यानंतर सुनावणी घेण्यात येईल असे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले. मात्र, त्याची अंमलबजावणी केली नाही.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीRamdas Kadamरामदास कदम