शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
2
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
3
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
4
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
5
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
6
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
7
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
8
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
9
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
10
चौथ्या स्टेजच्या कर्करोगाशी झुंजतेय अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी, तिला सतावतेय ९ वर्षांच्या मुलीची चिंता
11
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
12
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
13
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
14
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
15
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण
16
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
17
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
18
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
19
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
20
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास

सायकलस्वाराचा रॅलीत दुर्दैवी मृत्यू

By admin | Updated: February 8, 2015 23:48 IST

सायकलस्वाराचा रॅलीत दुर्दैवी मृत्यू

नाशिक : नाशिक सायकलिस्टच्या वतीने आयोजित सायकल रॅलीत सहभागी झालेले सायकलस्वार दिलीप रामचंद्र बोरावके (५२) यांचा घोटीनजीक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली.सायकल रॅलीला सकाळी नाशिक येथून प्रारंभ झाला होता. घोटीमार्गे वैतरणा डॅम, त्र्यंबकेश्वर, अंबोली फाटा, कश्यपी धरण मार्गे सायकल रॅली निघाली होती. या रॅलीत दिलीप बोरावके हेदेखील सहभागी झाले होते. खंबाळेनजीक चढ चढत असताना त्यांना अचानक त्रास होऊ लागल्याने बोरावके साकलवरून कोसळले. त्याचवेळी सायकलस्वार स्पर्धकांच्या मागे असलेल्या वैद्यकीय पथकाने त्यांना तातडीने नाशिक येथील साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. बोरावके हे उद्योजक असून, नाशिक सायकलिस्टचे ते सक्रिय कार्यकर्ते होते.नागरिकांनी सायकलचा वापर करावा यासाठी ते नेहमीच सक्रिय होते. सायकल रॅलीदरम्यान एका सायकलस्वाराचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तसेच सायकल रॅलीचा पारितोषिक वितरण समांरभही रद्द करण्यात आला आहे.(प्रतिनिधी)