शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाच्या विभागीय कार्यालयाला ठोकले टाळे

By admin | Updated: July 21, 2016 23:14 IST

अभियांत्रिकी निकाल : विद्यार्थी कृती समितीतर्फे आंदोलन

नाशिक : अभियांत्रिकी निकालाबाबत समितीच्या अहवालानंतरही विद्यार्थ्यांमध्ये अन्याय झाल्याची भावना असून, याप्रकरणी कृती समितीने नाशिक विभागीय कार्यालयास टाळे ठोकले. विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, अशी पुन:श्च मागणी करण्यात आली.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत अभियांत्रिकी परीक्षेच्या द्वितीय, तृतीय आणि अंतिम वर्ष परीक्षेचा निकालातील गोंधळानंतर नियुक्त समितीनेही भ्रमनिरास केला असून, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना कोणताही लाभ झाला नसल्याचा आरोप करीत विद्यार्थी कृती समितीने तीव्र आंदोलन केले. विद्यार्थी संघटनांच्या तक्रारी आणि प्रत्यक्ष निकाल यांची तपासणी करण्यासाठी विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉ. व्ही. बी. गायकवाड, विद्यापीठ व्यवस्थापन समितीचे सदस्य गजानन खराटे आणि डॉ. योगेश नेरकर या तीन सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली होती.या समितीने काय निर्णय घेतला आणि कोणते निकष लावले याची माहिती नाशिक विभागीय कार्यालयाकडे नसल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थी कृती समितीने तीव्र आंदोलन छेडले. कोणत्याही कारणासाठी ‘पुण्याला जायचेच असेल तर मग नाशिक विभागीय कार्यालयाची गरजच काय’ असा सवाल करत विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष आकाश पगार यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक विभागीय कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले.या आंदोलनादरम्यान पोलिसांनी मध्यस्थी करत विद्यापीठ समन्वयक रावसाहेब शिंदे यांनी परीक्षा नियंत्रक अशोक चव्हाण यांच्याशी दूरध्वनीवरून बोलणे करून दिले. या संभाषणा दरम्यान तृतीय आणि अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी अधिनियमन ४ लागू करण्यात येणार असून, या अधिनियमाप्रमाणे लेखी परीक्षेत ७० पैकी २१ पेक्षा अधिक गुण आणि सहामाही परीक्षेत नऊपेक्षा अधिक गुण असलेले आणि फक्त एकाच विषयात अनुत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना अधिनियमन चारप्रमाणे दहा गुण देण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक अशोक चव्हाण यांनी दूरध्वनीद्वारे दिली. यावेळी विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष आकाश पगार यांच्यासह विशाल गांगुर्डे, आकाश भामरे, कौस्तुभ आंधळे, आदित्य गायकवाड, पराग भामरे, अभिजित बुराडे, स्वप्नील सोनवणे, रवि गोवर्धने आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)