शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: आंदोलकांकडे कोणतीही परवानगी नाही, दुपारी ३ पर्यंत जागा रिकामी करा: मुंबई हायकोर्ट
2
“बस… जरांगे आता थांबा! आंदोलन संपवून सरकारला सहकार्य करा, नामुष्की टाळा”; कुणी दिला सल्ला?
3
"काँग्रेसच्या स्टेजवरून माझ्या आईला शिवी दिली, हा अपमान..."; पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले भावूक
4
बुरख्यातली गर्लफ्रेंड निघाली मुलगा! एकत्र प्रवास करूनही ओळखू शकला नाही बॉयफ्रेंड; पुढचं ऐकून व्हाल हैराण
5
"लक्षात ठेवा तुमच्याही लोकांना, नेत्यांना महाराष्ट्रात यायचं आहे"; मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन काय बोलले?
6
पीटर नवारोंनी पुन्हा गरळ ओकली, मोदी-पुतिन-जिनपिंग यांच्या भेटीवर केले मोठे विधान
7
Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
8
बलात्काराचा आरोप असलेला AAP आमदार गोळीबार करत पोलिसांच्या तावडीतून पळाला...
9
काय आहे शी जिनपिंग यांचा 'GGI फॉर्म्युला'?, अमेरिकेला थेट आव्हान; रशिया-भारताचा तात्काळ होकार
10
बनावट पासपोर्ट वापरल्यास कठोर शिक्षा; नवीन स्थलांतर व परदेशी नागरिक कायदा लागू
11
"भारतानं रोखलं आमचं SCO सदस्यत्व!"; मुस्लीम देश भडकला; म्हणाला, 'पाकिस्तान...'
12
Ganesh Festival 2025: 'घालीन लोटांगण' सुरू होताच स्वत:भोवती प्रदक्षिणा घालता का? थांबा, तुम्ही चुकताय
13
Lalbaugcha Raja: लालबागचा राजा मंडळाला मानवी हक्क आयोगाची नोटीस; ‘व्हीआयपी’ दर्शनाबाबत तक्रार!
14
औषधांवर २०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लॅन; भारतावर किती होणार परिणाम?
15
सोन्याने गाठली विक्रमी पातळी! तुमच्या शहरात एक तोळ्याचा आजचा भाव काय? अचानक का आली तेजी?
16
४ शुभ योगात परिवर्तिनी एकादशी: तुळशीचा १ उपाय करा, पूर्ण पुण्य मिळवा; श्रीविष्णू कृपा करतील
17
MI च्या ताफ्यातून स्टार झालेल्या पोलार्डची शाहरुखच्या संघाकडून 'हिरोगिरी'! ८ चेंडूत ७ गगनचुंबी षटकार (VIDEO)
18
शिक्षकांना नोकरीत टिकून राहण्यासाठी टीईटी देणे अनिवार्य, राज्यांच्या याचिकांवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल
19
तुळजाभवानीच्या पुजारी मंडळावरून पेटला वाद, आजी-माजी पदाधिकारी आमने-सामने
20
आंदोलनात बेकायदेशीर कृत्ये, लवकरात लवकर मैदान रिकामं करा; मनोज जरांगेंना पाठवलेल्या पोलिसांच्या नोटीसमध्ये काय?

शहरात एकात्मता दौड

By admin | Updated: October 31, 2015 23:51 IST

राष्ट्रीय एकता दिन : शिस्तबद्ध संचलनाने नागरिकांचे वेधले लक्ष

 नाशिक : देशाचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय एकता दिनानिमित्त पोलीस आयुक्तालयातर्फे शहरातील मुख्य रस्त्यांवरून शनिवारी (दि़३१) सायंकाळी रूट मार्च काढण्यात आला़ मोर्चाच्या अग्रभागी असलेल्या वाहनावर भारताच्या तिरंगासह बॅण्डपथकाची साथ व शिस्तबद्ध संचलन यामुळे या रुटमार्चने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले होते़ पोलीस मुख्यालयातील मारुती मंदिराजवळून या रुटमार्चला सुरुवात झाली़ येथून के.टी़एच़एम़ कॉलेज, डोंगरे वसतिगृह, कॅनडा कॉर्नर, कुलकर्णी गार्डन, मनपा कार्यालयासमोरून टिळकवाडी सिग्नलकडून पुढे जात पोलीस कवायत मैदानावर जात या रुटमार्चचे समाप्ती झाली़ या रुटमार्चमध्ये नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील महिला व पुरुषांचे पथक, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचे दोन पथक, गृहरक्षक दल, अग्निशमन दल, नागरी संरक्षण दल तसेच शहर वाहतूक पोलिसांचे पथक सहभागी झाले होते़ याबरोबरच अग्निशमन दलातील वाहनाचाही समावेश होता़पोलीस उपआयुक्त विजय पाटील, पंकज डहाणे, अविनाश बारगळ, श्रीकांत धिवरे, ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत मोहिते, सहायक पोलीस आयुक्त अतुल झेंडे, सचिन गोरे, डॉ़ राजू भुजबळ, विजयकुमार चव्हाण, प्रशांत वाघुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा रुटमार्च काढण्यात आला़ यावेळी अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत सोमवंशी, शंकर काळे, मनोज कारंजे, सुरेश सपकाळे आदिंसह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते़ एकता दौडमध्ये मान्यवरांचा सहभागसरदार पटेल जयंतीनिमित्त सकाळी छत्रपती शिवाजी स्टेडियमपासून एकता दौड काढण्यात आली़ यामध्ये अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, पोलीस उपायुक्त विजय पाटील, एऩ अंबिका, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांच्यासह शाळेचे विद्यार्थी व क्रीडाशिक्षक सहभागी झाले होते़ प्रारंभी सर्वांना शपथ देण्यात आली़