शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडीच्या पाण्याविरोधात सर्वपक्षांची एकजूट

By admin | Updated: October 25, 2015 22:34 IST

जायकवाडीच्या पाण्याविरोधात सर्वपक्षांची एकजूट

नाशिक : नाशिक व नगर जिल्ह्णातील धरण समूहातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या निर्णयाविरोधात या दोन्ही जिल्ह्णांतील सर्वपक्षीय नेते एकत्र आले आहेत़ भुजबळ फार्म येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत पाण्याचा तीव्र करण्याचा निर्णय शनिवारी (दि़२४) घेण्यात आला. या लढ्याची सर्व सूत्र ही भुजबळ फार्मवरून हलविली जाणार असून, यासाठीच्या कृती समिती निमंत्रकपदी आमदार अनिल कदम यांची निवड करण्यात आली आहे़नाशिक व नगर जिल्ह्णातील पाच धरणांतून जायकवाडी धरणात १२.८४ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय गोदावरी मराठवाडा विकास महामंडळाने दिला. जिल्ह्णात अत्यल्प धरणसाठा असून, जायकवाडीला पाणी सोडल्यास नाशिक जिल्ह्णात गंभीर स्थिती होऊ शकते. पुरेसे पाणी शिल्लक नसल्याने भविष्यात पिण्याचे पाणी व शेतीसाठी अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच सध्याचा साठा हा पुढील वर्षी पाऊस होईपर्यंत वापरावा लागणार आहे. त्यामुळे इतरत्र पाणी सोडणे म्हणजे नाशिकवर अन्याय करण्यासारखेच होईल. महामंडळाच्या पाणी सोडण्याच्या निर्णयाविरोधात काँग्रेस, शिवसेना एकत्र आले आहेत, तर नगर जिल्ह्णातील काँग्रेस नेतेही एकत्र आले असून, या निर्णयाविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. नाशिकमध्ये भारतीय जनता पार्टी वगळता महापालिकेतील सर्वपक्षीय गटनेत्यांनी जायकवाडीला पाण्याचा एक थेंबही न देण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेनेही गंगापूर धरणावर आंदोलन करून निर्णयास विरोध केला आहे़माजीमंत्री मधुकर पिचड यांनी आमदार छगन भुजबळ यांची शनिवारी भेट घेऊन दोन्ही जिल्ह्णातील नेत्यांनी एकित्रत लढा देण्याबाबत चर्चा केली़ त्यास पाठिंबा दर्शवित भुजबळांनी तातडीने सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावून याबाबत चर्चा केली़ या गुप्त बैठकीत आंदोलन तीव्र करण्याबाबत चर्चा होऊन सोमवारी (दि.२६) पाणी सोडण्याचा निर्णय झाल्यास काय भूमिका घ्यायची याबाबत नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली़पाणीप्रश्नाबाबत भुजबळ फार्मवर झालेल्या बैठकीत नाशिक व नगर जिल्ह्णातील सर्वपक्षीय नेते एकत्र आल्याने आंदोलनाची धार वाढणार हे निश्चित आहे़ या बैठकीला आमदार मधुकर पिचड, महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा, आमदार जयवंत जाधव, स्थायी समिती सभापती शिवाजी चुंबळे, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, अर्जुन टिळे, विरोधी पक्षनेता कविता कर्डक, जलसिंचनचे राजेंद्र जाधव आदि उपस्थित होते.