नाशिक : सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचार, लाचखोरी, तसेच ओझर विमानतळावरील साग्रसंगीत पार्टीतील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी गांधीगिरी करून अनोखे आंदोलन केले़ त्र्यंबकरोडवरील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयातील चार अभियंत्यांना उपरोधिक ‘आदर्श लाचखोर अभियंता’ पुरस्कार व मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले़ विशेष म्हणजे, या आंदोलनाची पूर्वकल्पना असल्याने मुख्य अभियंत्यांनी वेळीच काढता पाय घेतला होता़ सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी लाचखोर अभियंता सतीश चिखलीकर, संजय दशपुते यांच्याकडील चौकशीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कोट्यवधी रुपयांची संपत्ती मिळाली़ जनतेचा रोष शमविण्यासाठी चौकशी समितीची नेमणूक करण्यात आली. मात्र, प्रकरण थंड होताच हा चौकशी अहवाल बासनात गुंडाळण्यात आला़
गांधीगिरी करून अनोखे आंदोलन
By admin | Updated: April 14, 2015 01:46 IST