शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय राज्यमंत्र्यांनी घेतली शिर्के यांची भेट

By admin | Updated: February 16, 2017 22:43 IST

सुभाष भामरे : पोलिसांबाबत मुख्यामंत्र्यांकडे तक्रार करणार

मालेगाव : गोवंश रक्षक मच्छिंद्र शिर्के यांच्यावर झालेला हल्ला निंदणीय आहे. पोलिसांनी या अगोदर गोवंश हत्त्याबंदी कायद्यांतर्गत कारवाई केली नाही. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पोलिसांना जाब विचारण्यास सांगणार असल्याचे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री तथा धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी सांगितले.शिर्के यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. शिर्के यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे आज मालेगावी आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी डॉ. भामरे पुढे म्हणाले की, शहरासह इतर ठिकाणी गोवंश हत्त्याबंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी होत नाही. यासंदर्भात पोलीस यंत्रणा दिरंगाई करीत आहे. याबाबतही मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाणार आहे. शिर्के यांच्यावर झालेला हल्ला निंदणीय आहे. या घटनेसंदर्भात पोलीस यंत्रणेला तपासाच्या योग्य त्या सूचना करणार असल्याचेही डॉ. भामरे यांनी यावेळी सांगितले. तत्पूर्वी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे यांनी शिर्के यांची रुग्णालयात भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर येथील संघ कार्यालयात प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी महानगरप्रमुख सुनील गायकवाड, सुरेश निकम, मदन गायकवाड, हरिप्रसाद गुप्ता, उमाकांत कदम, संजय काळे, राजेंद्र शेलार, प्रदीप बच्छाव आदिंसह भाजपा, विहिंप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)मालेगावी हल्ल्यात जखमी झालेले गोवंश रक्षक मच्छिंद्र शिर्के यांची तपासणी करताना केंद्रीय संरक्षण राज्यमंत्रीडॉ. सुभाष भामरे. समवेत भाजपाचे महानगरप्रमुख सुनील गायकवाड, प्रदीप बच्छाव आदि.