अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी, श्रीरामपूर भागात सराईत गुन्हेगार पाप्या शेखच्या टोळीने निर्माण केलेले वर्चस्व अन् पसरविलेली दहशत संपविण्यासाठी दोन तरुणांच्या अमानुष अन् क्रूर हत्याकांडाचा योग्य तपास त्यावेळी श्रीरामपूरचे तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक असलेले कडासने यांनी स्वत:कडे घेतला होता. पाप्या टोळीभोवती २०११ साली मोक्काचा फास आवळला होता. यावेळी पाप्या शेखच्या विरोधात साक्ष देण्यासाठी साक्षीदार देखील घाबरत होते. नाशिकच्या विशेष मोक्का न्यायालयात दोषारोपपत्र तत्परतेने दाखल करुन परिस्थितीजन्य पुरावे, साक्षीदार कडासने व त्यांच्या पथकाने यांनी न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने २०१८ साली या टोळीला जन्मठेप व १ कोटी ३८ लाखांचा दंड ठोठावला होता.
--इन्फो--
२०१८ सालापासून दिला जातो पुरस्कार
अत्यंत आव्हानात्मक व क्लिष्ट अशा गंभीर हत्याकांडाचा यशस्वी तपास केल्याबद्दल पुणे गुन्हे अन्वेषण विभागाचे महासंचालक यांनी कडासने यांचा हा तपास केंद्र सरकारच्या ‘केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट अन्वेषण पदक’ पुरस्कारासाठी पाठविला. भारत सरकारकडून देशभरातील १५२ पोलीस अधिकारी यांना हे पदक जाहीर करण्यात आले आहे. २०१८ सालापासून या पुरस्काराची सुरुवात केंद्रीय गृह मंत्रालयाकडून करण्यात आली असून यावर्षी राज्यातील ११ पोलीस अधिकाऱ्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून यामध्ये कडासने यांचाही समावेश आहे.
120821\12nsk_37_12082021_13.jpg
केंद्रीय गृहमंत्री सर्वोत्कृष्ट अन्वेषण पदक