शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम उद्या नाशकात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 01:27 IST

नाशिक : देशाच्या सध्याच्या आर्थिक व सामाजिक परिस्थितीवर नाशिककरांशी संवाद साधण्यासाठी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम शनिवार, दि. ७ जुलै रोजी नाशकात येत असून, त्यांच्या उपस्थितीत चोपडा लॉन्स येथे दुपारी चार वाजता परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देपरिसंवाद : चव्हाण, केतकर, ठिपसे येणार

नाशिक : देशाच्या सध्याच्या आर्थिक व सामाजिक परिस्थितीवर नाशिककरांशी संवाद साधण्यासाठी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम शनिवार, दि. ७ जुलै रोजी नाशकात येत असून, त्यांच्या उपस्थितीत चोपडा लॉन्स येथे दुपारी चार वाजता परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.देशातील कथीत अर्थक्रांती विषयी सध्या वेगवेगळे मतप्रवाह आहेत. देशातील आर्थिक सुधारणा केल्याचे अनेक दावे आणि त्याला प्रतिदावे देखील केले जात आहेत. या सर्व प्रश्नांमुळे देशातील वातावरण घुसळून निघत असले तरी यासंदर्भातील वस्तुस्थिती काय आहे, हे समाजातील जाणकार वर्गापर्यंत पोहोचावे यासाठी कॉँग्रेस पक्षाच्या वतीने परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून, यापूर्वी ठाणे, नागपूर, औरंगाबाद येथे अशा प्रकारचे आयोजन करण्यात आले होते.चिदंबरम यांच्या समवेत प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण, खासदार कुमार केतकर व उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ठिपसे हेदेखील परिसंवादात सहभागी होतील. देशातील वाढती महागाई, बेरोजगारी, औद्योगिक क्षेत्रातील मंदी, भारताची आर्थिक परिस्थिती, नोटबंदीचे परिणाम, जागतिक अर्थव्यवस्थेचे भारतावर होणारे परिणाम या विषयावर चिदंबरम संवाद साधतील तर कुमार केतकर व अभय ठिपसे हे सध्याच्या परिस्थितीवर स्वत:चे अनुभव कथन करणार आहेत.नाशिक जिल्ह्यातील उद्योजक, चार्टर्ड अकौंटंट, वकील, प्राध्यापक, बॅँकिंग क्षेत्र, व्यावसायिकांसाठी हा परिसंवाद महत्त्वाचा ठरणार असल्याने सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन माजीमंत्री शोभाताई बच्छाव, जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शहराध्यक्ष शरद अहेर, शाहू खैरे, हेमलता पाटील, वत्सला खैरे यांनी केले आहे.