शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाश आंबेडकरांशिवाय एकीकरण अशक्य : रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 01:24 IST

विखुरलेल्या रिपब्लिकन नेते आणि जनतेला एकत्र आणून रिपब्लिकन ऐक्य आवश्यक आहे. मात्र, भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या शिवाय ऐक्य शक्य नसल्याचा पुनरुच्चार रिपाइं नेते रामदास आठवले यांनी केला.

नाशिक : विखुरलेल्या रिपब्लिकन नेते आणि जनतेला एकत्र आणून रिपब्लिकन ऐक्य आवश्यक आहे. मात्र, भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या शिवाय ऐक्य शक्य नसल्याचा पुनरुच्चार रिपाइं नेते रामदास आठवले यांनी केला.  काळाराम मंदिर सत्याग्रह स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी आठवले नाशिकमध्ये आले होते, तेव्हा त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आठवले म्हणाले, सध्याच्या परिस्थितीत रिपाइंचे ऐक्य होणे आवश्यक वाटत असेल तर ऐक्याची घोषणा करणाºयांना अगोदर ऐक्याचा अजेंडा राबविला पाहिजे. यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी पुढाकार घेतला आणि जबाबदारी स्वीकारली तर आपण आपला पक्ष विलीन करून ऐक्यात सामील होऊ, असेही आठवले यांनी सांगितले.  समाजाच्या विकासासाठी ऐक्य होणार असेल तर आपण प्रसंगी आपले मंत्रिपद सोडून द्यायलादेखील मागेपुढे पाहणार नाही. इतर कोणत्याही पक्षांनी दलित अत्याचाराचे राजकारण करणे चुकीचे आहे. भारतीय जनता पार्टी हा पक्ष जातीयवादी नाही, तर जे या पक्षाला जातीयवादी म्हणतात तेच जातीयवादी असल्याचा आरोप आठवले यांनी केला. अनेक जातिधर्माचे नेते भाजपामध्ये मंत्री आणि नेते आहेत. त्यामुळे भाजपाला जातीयवादी पक्ष म्हणणे चुकीचे असल्याचे आठवले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. कोरेगाव भीमा प्रकरणी न्यायालयाने तीन महिन्यांचा कालावधी चौकशीसाठी दिल्याने चौकशीनंतर दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी असल्याचेही ते म्हणाले. दलित-मराठा वाद जाणीवपूर्वक पेटविला जात असून, अशा प्रवृत्तींपासून दोन्ही समाजाने सावध राहिले पाहिजे . वास्तविक हे दोन्ही समाज शिवाजी महाराजांच्या काळापासून एकत्र आहेत. त्यांच्यात आता फूट पाडण्याचे राजकारण होत असल्याचा आरोप त्यांनी केला.राणेंनी आॅफर स्वीकारावीमाजी मुख्यमंत्री नारायण राणे हे राज्यातील मोठे नेते आहेत. भाजपाने त्यांना राज्यसभेची आॅफर दिली असेल तर त्यांनी केंद्रात आले पाहिजे. पक्ष वाढीसाठी त्यांनी भाजपाची आॅफर स्वीकारली पाहिजे, असा सल्ला आठवले यांनी राणे यांना दिला. राज्यात शिवसेनेने राणे यांच्या मंत्रिपदाला आक्षेप घेतल्यामुळे राणे यांच्यासाठी फडणवीस सेनेची नाराजी ओढावून घेणार नाहीत. त्यामुळेच राणे यांचा मंत्रिमंडळातील प्रवेश अनिश्चित आहे. राणे यांना मंत्रिपद मिळाले तर सेना सत्तेतून बाहेर पडेल आणि त्यांना राष्टÑवादी तसेच कॉँग्रेसने साथ दिली तर भाजपा सरकार पडू शकेल अशी शक्यता गृहीत धरून कदाचित राणे यांची मंत्रिपदावर वर्णी लागणे तूर्तास शक्य नसल्याचे आठवले यांनी सांगितले.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवले